Gadar 2 Collection : सनी देओलचा धुमाकूळ, गदर २ ची ६ व्या दिवशीही गती कायम | पुढारी

Gadar 2 Collection : सनी देओलचा धुमाकूळ, गदर २ ची ६ व्या दिवशीही गती कायम

पुढारी ऑनलाईन डेस्क : गदर २ चित्रपटाची शानदार कमाई पाहता पाच दिवसात २२६ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. गदर २ चित्रपटगृहात रिलीज होताच प्रत्येक दिवशी दमदार कमाई करत आहे. चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. (Gadar 2 Collection) या पाच दिवसात सनी देओल आणि अमीषा पटेलच्या या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली आहे. तर सहाव्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत. गदर २ चे ६ दिवसातील कलेक्शन २६३. ४८ कोटी झाले आहे. गदरने बुधवारी इंडियामध्ये ३४.५० कोटी कमावले. गदर २ चित्रपट २०२३ चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट झाला आहे. (Gadar 2 Collection)

गदर २ ने स्वातंत्र्य दिनी रेकॉर्डतोड ५५.५ कोटींची कमाई केलीय. चित्रपटाची शानदार कमाई पाहता सनी देओलच्या चित्रपटाची तुलना शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट पठानशी होत आहे. आतापर्यंत गदर २ ने पाच दिवसांत २२६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पण, कमाईच्या बाबतीत सनी देओलचा चित्रपट शाहरुख खानच्या पठानला मागे टाकू शकलेला नाही. गदर २ ने पाच दिवसात २२६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर पठानने पाच दिवसात २७० कोटींची कमाई केली होती. पठान आणि गदर २ मध्ये आता ४४ कोटी रुपयांचा अंतर आहे. याशिवाय, अनेक ट्रेड ॲनालिस्ट्सचे म्हणणे आहे की, गदर २ हा चित्रपट पठानला मागे टाकू शकतो की नाही हे येत्या काही दिवसात कळेल.

Back to top button