

Akshay Kumar real estate Mumbai
मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने गेल्या सात महिन्यांत मुंबईतील विविध मालमत्तांच्या विक्रीतून तब्बल 110 कोटींहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. या व्यवहारांमध्ये बोरीवली, वरळी आणि लोअर परळ यांसारख्या प्रमुख भागांतील आलिशान अपार्टमेंट्स आणि व्यावसायिक कार्यालयांचा समावेश आहे. अक्षय कुमारने केलेल्या काही प्रमुख मालमत्ता विक्रींचा आढावा-
विक्री तारीख: 21 जानेवारी 2025
अक्षयने ओबेरॉय स्काय सिटी (Oberoi Sky City), बोरीवली येथील 1073 चौ.फु. क्षेत्रफळ असलेला फ्लॅट 4.25 कोटींना विकला. हा फ्लॅट नोव्हेंबर 2017 मध्ये 2.38 कोटींना घेतलेला होता. म्हणजेच त्याला जवळपास 78 % नफा झाला आहे.
विक्री तारीख: 31 जानेवारी 2025
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट प्रोजेक्टमधील 6830 चौ.फु. क्षेत्रफळ असलेला 39 व्या मजल्यावरील आलिशान फ्लॅट 80 कोटींना विकला. या व्यवहारात चार पार्किंग स्लॉट्सचा देखील समावेश होता.
विक्री तारीख: 8 मार्च 2025
अक्षयने याच ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये आणखी एक 1073 चौ.फु. चा फ्लॅट 4.35 कोटींना विकला. त्याला यावर 84 % परतावा मिळाला.
विक्री तारीख: 20 मार्च 2025
अक्षयने दोन अपार्टमेंट्स – 1080 चौ.फु. चा फ्लॅट 5.35 कोटींना तर 252 चौ.फु. चे स्टुडिओ अपार्टमेंट 1.25 कोटींना एकत्र विकले. दोन्ही 2017 मध्ये खरेदी केले होते आणि त्यावर त्याला 89 % नफा झाला.
विक्री तारीख: 16 एप्रिल 2025
अक्षयने 'वन प्लेस लोढा' प्रोजेक्टमधील 1146 चौ.फु. चे व्यावसायिक कार्यालय 8 कोटींना विकले. हे कार्यालय त्याने 2020 मध्ये 4.85 कोटींना विकत घेतले होते. या व्यवहारात त्याला 65 % नफा मिळाला. खरेदीदारांनी दोन पार्किंग स्पेससह ही मालमत्ता खरेदी केली.
विक्री तारीख: 16 जुलै 2025
अक्षय कुमारने ओबेरॉय स्काय सिटीमधील दोन शेजारील फ्लॅट्स 7.10 कोटींना विकले. ही अपार्टमेंट्स त्याने 2017 मध्ये 3.69 कोटींना घेतली होती, म्हणजे त्याला 92 % परतावा मिळाला.
अक्षय कुमारने एकूण 8 मालमत्ता विक्रीतून 110 कोटींपेक्षा अधिक रुपये मिळवले आहेत. बहुतेक व्यवहारांमध्ये त्याला 65 % ते 92 % रेट ऑफ इंटरेस्ट (परतावा) मिळालेला आहे, जे मुंबईच्या रिअल इस्टेट बाजाराच्या तुलनेत अत्यंत फायदेशीर ठरले आहेत.
अक्षय कुमारने केलेल्या या व्यवहारांमधून स्पष्ट होते की, रिअल इस्टेटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक ही खूप फायदेशीर ठरू शकते, विशेषतः जर ती मुंबईसारख्या शहरात योग्य लोकेशन आणि विश्वसनीय डेव्हलपरकडून केलेली असेल.
या व्यवहारांनी केवळ त्याच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा दिला नाही, तर मुंबईच्या लक्झरी प्रॉपर्टी मार्केटमधील उत्साहही अधोरेखित केला आहे.