US vs Russia Submarine | महासागरांवर वर्चस्व कुणाचे अमेरिका की रशिया? कुणाकडे आहेत सर्वाधिक शक्तिशाली सबमरीन्स?

US vs Russia Submarine |अमेरिका आणि रशिया यांच्यातील ताज्या वक्तव्यानंतर पुन्हा सुरु झाली सागरी सामर्थ्याची चर्चा
US vs Russia Submarine Power
US vs Russia Submarine Power pudhari
Published on
Updated on

US vs Russia Submarine power

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका ट्विटच्या उत्तरात अणुयुद्धाच्या सावल्या पुन्हा एकदा जागतिक रंगमंचावर आल्या आहेत. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी ‘डेड हँड’ या जुन्या अणु-प्रत्युत्तर यंत्रणेचा उल्लेख करत अमेरिकेला धमकी दिली.

याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन अमेरिकन अणु पाणबुड्या “योग्य ठिकाणी” हलवण्याचा आदेश दिला. या हालचालीने जागतिक शक्ती संतुलनात पुन्हा एकदा पाणबुडी शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

अमेरिका व रशिया: पाणबुडी संख्या आणि सामर्थ्य

पाणबुडी संख्या (2025 अनुसार):

अमेरिका: 70 पाणबुड्या

रशिया: 63–64 पाणबुड्या

जरी संख्या जवळपास सारखी वाटत असली, तरी या पाणबुड्यांची उपयोग पद्धती, तैनात क्षेत्र आणि शस्त्रसज्जता यावर खरे सामर्थ्य ठरते.

अमेरिकन पाणबुड्या- अटलांटिक, पॅसिफिक व हिंद महासागरात तैनात आहेत. AUKUS आणि NATO सहकार्यामुळे त्यांचा सामरिक वापर अधिक जागतिक स्वरूपाचा आहे.

रशियन पाणबुड्या- आर्क्टिक, उत्तर अटलांटिक आणि पूर्वेकडील पॅसिफिकमध्ये अधिक केंद्रित आहेत. काही वेळा त्या NATO किनाऱ्यांजवळ किंवा अमेरिकेच्या जवळही दिसल्या आहेत, जे शीतयुद्धातील रणनीतीची आठवण करून देतात.

US vs Russia Submarine Power
Cluely dating bonus | प्रेम जुळवा, बोनस मिळवा! ऑफिसमधील सहकाऱ्याला डेटवर पाठवल्यास रु. 42000 रोख मिळणार, Refer-a-Date स्कीम चर्चेत

अणु प्रतिबंधक क्षमता (Nuclear Deterrence)

अमेरिकन SSBNs (Ballistic Missile Submarines):

Ohio-class (14 पाणबुड्या):

  • प्रत्येक पाणबुडीवर 20 Trident D5 क्षेपणास्त्रे

  • एकाच वेळी अनेक अणु शस्त्र प्रक्षेपित करण्याची क्षमता

  • दीर्घकाळ पाण्याखाली राहण्यास सक्षम

रशियन SSBNs:

Borei-class (8 सेवेत, आणखी 3 येणार):

  • प्रत्येकी 16 Bulava ICBMs

  • टॉरपीडो व अँटी-सबमरीन क्षेपणास्त्रांनी सज्ज

Delta IV-class (किमान 6 सेवेत):

  • जुनी पण अद्ययावत केलेली

  • Sineva SLBMs ने सज्ज

फास्ट-अटॅक पाणबुड्या (Fast Attack Submarines): सामरिक ताकद

अमेरिका:

Virginia-class: अत्याधुनिक, गुप्तचर मोहिमा, टॉमहॉक क्षेपणास्त्रे

Los Angeles-class: 1970 मधील पण अद्ययावत

Seawolf-class: केवळ 3, पण उच्च दर्जाचे गुप्त संचालन

रशिया:

Yasen-M class: Kalibr, Oniks व भविष्यात Tsirkon (Hypersonic) क्षेपणास्त्र संभाव्यता

  • अत्यंत शांत व लवचिक

  • Akula-class: जुने पण सुधारित

US vs Russia Submarine Power
China BVR missile | भारतासाठी धोक्याची घंटा! चीनच्या BVR क्षेपणास्त्राने वाढवलं टेन्शन; 1000 किमी रेंज, ध्वनीपेक्षा पाचपट वेगवान...

अमेरिका का आघाडीवर आहे?

उत्तम तैनाती क्षमतेमुळे: अमेरिका आपल्या पाणबुडी जागतिक स्तरावर तैनात करते – NATO, Indo-Pacific व इतर सहयोगी देशांसोबत.

टिकाऊ व शक्तिशाली तंत्रज्ञान: Long-life reactors, Large Aperture Bow sonar – हे तंत्रज्ञान अमेरिकेला जलतळात अद्वितीय आघाडी देते.

रशिया कसा झपाट्याने पुढे येतोय?

Yasen-M व Borei-A क्लास पाणबुड्यांमुळे आधुनिकरण: Tsirkon सारखे Hypersonic क्षेपणास्त्र व conformal sonar प्रणाली वापरणे हे अमेरिकेसमोरील आव्हान ठरू शकते.

दरवर्षी १-२ अणु पाणबुड्यांची निर्मिती: Sevmash शिपयार्डकडून सतत नवीन पाणबुडी सेवा मध्ये. अलीकडेच Putin यांनी Alexander III Borei-A पाणबुडीचे जलावतरण केले.

US vs Russia Submarine Power
Macdonalds Walmart boycott | मॅकडोनाल्ड्स, वॉलमार्टविरोधात अमेरिकेतील जनता रस्त्यावर; संपूर्ण महिनाभर बहिष्कार...

ट्रम्प-मेदवेदेव संघर्ष- पाणबुडी का चर्चेत?

“Dead Hand” हा उल्लेख म्हणजे रशियाचा अत्यंत गंभीर इशारा. याला ट्रम्प यांनी त्वरित उत्तर दिले. दोन अमेरिकन अणु पाणबुड्यांना हालवण्याचा आदेश दिला.

या हालचाली सामान्यतः गुप्तपणे होतात. त्यामुळे ट्रम्प यांच्या सार्वजनिक घोषणेला खास महत्त्व आहे – रणनीतिक आणि राजकीय सिग्नल म्हणून.

तंत्रज्ञान, जागतिक पोहोच आणि सबंध घटकांमध्ये अमेरिका आघाडीवर आहे. पण रशिया आपल्या आधुनिक पाणबुडी निर्मिती व Hypersonic क्षेपणास्त्रांसह तुल्यबळ ठरत आहे. पुढील काही वर्षांत सामर्थ्यसंतुलन आणखी जसजसे बदलत जाईल, तसतसे हे संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news