

Bollywood actress Tabu Marathi speech
मुंबई - मुंबईत गुरूवारी मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारांनी महेश मांजरेकर यांना देण्यात आला. त्यांना त्यांच्या जुनं फर्निचर सिनेमासाठी सन्मानित करण्यात आलं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बहुमान मिळाला प्राजक्ता माळीला तिच्या फुलवंती या सिनेमासाठी देण्यात आला. सर्वोत्कृष्ट सिनेमा आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि प्रियांका चोप्रा निर्मित सिनेमा ‘पाणी’ ठरला. दरम्यान, या मंचावर बॉलिवूड अभिनेत्री तबूने एन्ट्री केली आणि सोहळ्यातील प्रेक्षकांकडून वाहव्वा मिळवलं. तबूने आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. वाचा संपूर्ण बातमी.
१० व्या फिल्मफेअर ॲवॉर्ड मराठी सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्कारांने सन्मानित करण्यात आलं. 'जुनं फर्निचर'साठीचा हा पुरस्कार अभिनेत्री तबूच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महेश मांजरेकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यापूर्वी तबूने मराठीत भाषणाला सुरुवात केली. तबू म्हणाली, मला खूप आनंद होतोय. मला हा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान करण्याचा सन्मान दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. मी हा पुरस्कार अशा दिग्दर्शकाला (महेश मांजरेकर) देत आहे, ज्यांनी 'अस्तित्व'सारख्या महत्त्वपूर्ण चित्रपटासाठी माझ्यावर विश्वास ठेवला.
''मला खूप आनंद होतोय. मला हा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान करण्याचा सन्मान दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. मी हा पुरस्कार अशा दिग्दर्शकाला देत आहे, ज्यांनी 'अस्तित्व'सारख्या महत्त्वपूर्ण चित्रपटासाठी माझ्यावर विश्वास ठेवला.''
''महेश मांजरेकर म्हणाले, मी ट्रॉफी घ्यायला विसरलो.. पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, पण तो माझी मैत्रीण तबू हिच्या हातून मिळाल्याने तो अधिक खास झाला आहे. माझ्या मते, ती जगातील सर्वोत्तम अभिनेत्री आहे. आजही जेव्हा मी 'अस्तित्व' पुन्हा पाहतो, तेव्हा तिने त्या चित्रपटात जे काम केले आहे. ते पाहून मी थक्क होतो...'' असंही यावेळी महेश मांजरेकर म्हणाले.