आमिर खानची फॅमिली
आमिर खानची फॅमिली

Aamir Khan ची आई झाली ९० ‍वर्षांची, जुही चावलाने पार्टीत लावले चारचाँद

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपली आई जीनत हुसैन यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने एक पार्टी ठेवली होती. बर्थडे स्पेशल बनवण्यासाठी या फॅमिली फंक्शनमध्ये जूही चावला सहभागी झाली होती. जूहीने या पार्टीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. या फोटोमध्ये आमिर खान आणि जूही चावला आईसोबत दिसत आहे. आता जूही चावलाने या फंक्शनचा एक इनसाईड फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती पोज देताना दिसत आहे. तिने खान फॅमिलीला या खास क्षणी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

अधिक वाचा –

जूही चावलाने शेअर केला फोटो

इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये फोटो शेअर करत जूहीने लिहिलं, अम्मीच्या स्पेशल बर्थडेला आपल्या संपूर्ण फॅमिलीला भेटून खूप आनंद झाला. फंक्शनसाठी जूही चावलाने व्हाईट कलरचा सूट परिधान केला होता. तर आमिर खानलादेखील व्हाईट कलर शेरवानीमध्ये पाहण्यात आले.

अधिक वाचा –

एका रिपोर्टनुसार, या फंक्शनमध्ये जवळचे फ्रेंड्स आणि फॅमिलीला आमंत्रित करण्यात आलं होतं. जीनत हुसैन यांचा वाढदिवस १३ जून रोजी होता. या मोठ्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी जवळजवळच्या शहरांतून एकूण २०० पाहुणे आले होते. आमिर खानच्या मुंबईतील घरामध्ये ही पार्टी होती?

अधिक वाचा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news