प्रतीक्षा संपली; श्रद्धा- राजकुमारच्या ‘स्त्री २’ची रिलीज डेट आली समोर

Stree 2
Stree 2

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या हॉरर-कॉमेडी 'स्त्री २' हा चित्रपट लवकच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता त्याची प्रतिक्षा संपली असून चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

श्रद्धा कपूरविषयी हेही माहित आहे काय?

  • श्रद्धा कपूरचा आगामी हॉरर-कॉमेडी 'स्त्री २' हा चित्रपट भेटीला आलाय.
  • या चित्रपटात श्रद्धा कपूर राजकुमार रावसोबत स्किन शेअर करणार आहे.
  • हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी पडद्यावर येत आहे.

नुकतेच अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या इन्स्टाग्रामवर आगामी हॉरर-कॉमेडी 'स्त्री २' हा चित्रपटाचा पोस्टर व्हिडिओ सेअर केला आहे. यात 'स्त्री २' हा चित्रपटाच्या शीर्षकासोबत चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट आता १५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार आहे. यामुळे श्रद्धाच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. मात्र, याआधी हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता.

चित्रपटाची घोषणा करताना श्रद्धाने लिहिले आहे की, "#Stree २ या स्वातंत्र्यदिनी पुन्हा येत आहे! #Stree २ या स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपटगृहात दाखल होईल." यावरून आता लवकरच श्रद्धाला पडद्यावर पाहण्यास चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधीही या चित्रपटातील एक हलकीशी झलक पाहायला मिळाली आहे.

स्त्री २ चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं आहे.तर दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्सद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट हॉरर आणि कॉमेडीवर आधारित आहे. याआधीचा स्त्री हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची चाहत्यांनी खूपच प्रशंसा केली होती.

धमाकेदार 'या' चित्रपटांना देणार टक्कर

श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक तगड्या चित्रपटांना टक्कर देणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री तापसी पन्नू, फरदीन खान आणि वाणी कपूर यांचा 'खेल खेल में' चित्रपट याचस दिवशी रिलीज होणार आहे. 'स्त्री २' हा चित्रपट 'खेल खेल में', जॉन अब्राहमच्या 'वेदा' आणि अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा २: द रूल' या चित्रपटाला टक्कर देणार आहे.

हेही वाचा 

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news