

पुढारी ऑनलाईन डेस्क
Female Krish ?? म्हणून ओळखली जाणारी सैयामी खेर हर्षवर्धन कपूरसोबत मिर्जिया या चित्रपटातून समोर आली. दरम्यान, नुकताच तिचा एक क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ती एक सुंदर आणि फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. तिची आई उत्तरा म्हात्रेदेखील एक मॉडेल होती. तिने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केलंय. पण, तिची खास गोष्ट म्हणजे तिचे चर्चेत असलेले फोटोशूट! Hot Shot अशी कमेंट्स मिळालेल्या सैयामी खेर हिची फोटोंमधील पोझ पाहून तुम्हालाही तिचे इन्स्टाग्राम पाहण्याचा मोह आवरणार नाही.
तिचे ग्लॅमरस फोटोशूट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहायला मिळतात. तिचे इन्स्टावर 618k फ़ॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह राहते.
राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा हिंदी चित्रपट मिर्जियामधून तिने डेब्यू केला होता. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत हर्षवर्धन कपूर होता. ती तेलुगु चित्रपट रेमध्येदेखील काम केलं आगे. याशिवाय ती रितेश देशमुखचा मराठी चित्रपट माऊलीमध्ये काम केलं होतं. हा तिचा मराठी विश्वातील डेब्यू होता.
याशिवाय ती नेटफ्लिक्सवरील "Chocked" वेबसीरीजमुळे बॉलिवूडमध्ये चर्चेत आली होती. कमी चित्रपट करून खूप कमी वेळात नाव कमावलेली सैय़ामीविषयी माहिती जाणून घ्या.
तिचे तीन महिन्यांत तीन डिजिटल प्रोजेक्ट रिलीज झाले होते. – स्पेशल ऑप्स, चोक्ड आणि ब्रीद: इन द शॅडो. स्पेशल ऑप्सममधील तिची छोटी भूमिकादेखील लोकांनी नोटिस केलीय.
ताहिरा कश्यप खुराना दिग्दर्शित शर्माजी की बेटी हा तिचा चित्रपट २०२२ मध्ये येणार आहे. तसेच हायवे हा तिचा तेलुगू चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक रिलीज झाला आहे.
तिचा ट्विटरवर क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती चित्रपटाच्या सेटवर षटकार मारताना दिसतेय.
ती महाराष्ट्रासाठी नॅशनल लेव्हलाक्रिकेट आणि बॅडमिंटन खेळली आहे. नॅशनल टीममध्ये वेगवान गोंलदाज सिलेक्शनसाठी तिला बोलावण्यात आलं होतं. पण, तिने अभिनय क्षेत्र निवडलं. अभिनयाआधी तिने मॉडलिंग केले. सैयामीला सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळायचं आहे.