मुंबई : विमानाला पुशबॅक करणाऱ्या वाहनालाच लागली आग; मोठी दुर्घटना टळली

मुंबई : विमानाला पुशबॅक करणाऱ्या वाहनालाच लागली आग; मोठी दुर्घटना टळली

मुंबई, पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज आतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांनी भरलेल्या विमानाला पुशबॅक करण्यासाठी आलेल्या वाहनाला, विमानाजवळच भीषण आग लागली. ६५७ क्रमांकाचे हे विमान मुंबईवरून जामनगरला निघाले होते. विमानाला रणवेवर ढकलण्यासाठी पुशबॅक वाहन विमानाला जोडण्यात येत होते. त्यावेळी अचानक विमानाजवळच या पुशबॅक वाहनाने पेट घेतला.

ही घटना घडताच शेजारीच असणाऱ्या एका दुसऱ्या पुशबॅक वाहनाने विमानाला आगीपासून दूर करण्यात आले. त्यानंतर विमानतळावरील अग्निशमन यंत्रणांच्या सहाय्याने पेटलेल्या वाहनाची आग शमवण्यात आली. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून, आग नेमकी कोणत्या कारणामुंळे लागली याचा तपास सुरू करण्यात आला आहे. ही आग लवकर आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news