HBD Deepika: अभिनेत्री दीपिका पादुकोण डाएटमध्ये खाते काय? | पुढारी

HBD Deepika: अभिनेत्री दीपिका पादुकोण डाएटमध्ये खाते काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या पर्सनॅलिटीचे अनेक जण चाहते आहेत. दीपिका पादुकोणचा फिटनेस आणि डाएट जाणून घेण्यासाठी तिचे अनेक चाहते उत्सुक असतात. पण, इतका फिटनेस मिळवण्यासाठी नेमकं ती (Deepika Padukone) डाएटमध्ये खाते काय? ते पाहूया

गरम पाण्याने दिवसाची सुरूवात

आपल्या दिवसाची सुरूवात ती कोमट पाण्याने करते. पाण्यामध्ये मध आणि लिंबूचा समावेश असतो. स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी ती नारळ पाणी किंवा फळांचा ज्युस पिते.

नाश्तामध्ये प्रोटीन डाएट

ती सकाळच्या नाश्तामध्ये प्रोटीन डाएट घेते. नाश्तामध्ये दोन अंडी खाते. तसेच एक ग्लास दूध पिते. त्याशिवाय नाश्तामध्ये उपमा, डोसा आणि इडली खाते.

दुपारच्या जेवणात हे पदार्थ खाते

दुपारच्या जेवणात ती २ रोटीसोबत भाज्या खाते. ग्रील्ड मासादेखील तिला आवडतो.

वर्कआउट

योगसह  कार्डिओ एक्सरसाईज आणि वेट ट्रेनिंगदेखील करते. शूटिंगवेळी ती आपल्या फिटनेससाठी सजग असते.

बॅडमिंटन आणि डान्स

ती बॅडमिंटनपटू होती. ती म्हणते की, बॅडमिंटन हा खेळ तिला फिट ठेवण्यासोबतचं तणावमुक्तदेखील ठेवतो. रोज कमीत कमी ती अर्धा तास डान्सदेखील करते.

दीपिका पादुकोण – रणवीर सिंह स्टारर चित्रपट ’83’ हा २४ डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये रणवीरने कपिल देव यांची भूमिका साकारली होती. तर दीपिकाने कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. आता ती अभिनेता शाहरुख खानसोबत पठान चित्रपटात दिसणार आहे. ‘पठान’ मध्ये जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ती ‘फायटर’ आणि ‘द इंटर्न’ च्या हिंदी रीमेकमुळेही चर्चेत आहे.

photo, video- deepikapadukonef.c insta वरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

Back to top button