बीड : अंत्यविधीसाठी जागाच उपलब्ध नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह तहसील कार्यालयात आणला | पुढारी

बीड : अंत्यविधीसाठी जागाच उपलब्ध नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह तहसील कार्यालयात आणला

केज, पुढारी वृत्तसेवा: केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील वृद्ध महिलेचे निधन झाले होते. तिचा अंत्यविधी करण्यासाठी गावात स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने संतप्त नातेवाईक व ग्रामस्‍थांनी महिलेचा मृतदेह केज तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवले.

केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील वयोवृद्ध महिला लक्ष्मीबाई शहाजी कसबे यांचे मंगळवार रात्री निधन झाले. अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी उपलब्ध नाही. यापूर्वी हे लोक शेजातील माळेगाव येथील सरकारी गायरान जमिनीत अंत्यविधी करीत होते. त्या गायरान जमिनीत काही वर्षापूर्वी मागासवर्गीय समाजातील भूमिहीन लोकांनी ती जमीन कसत आहेत. त्यामुळे त्यांना तेथे अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही.

सोनेसांगवी येथील ग्रामपंचायतीने खुल्या जागेत स्मशाभूमी करण्याचा ठराव घेतलेला आहे. परंतु, त्या शेजारील लोकानी विरोध केल्यामुळे संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी बुधवारी (दि. ५ ) रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान ट्रॅक्टरमध्ये महिलीचा मृतदेह  तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आणून ठेवला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले.

तहसीलदार दुलाजी मेंडके हे सरपंच विजयकुमार ईखे, सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे, रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, रवींद्र जोगदंड, मुकुंद कणसे यांच्याशी नातेवाईक संवाद साधला. युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे आणि केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे व पोलीस कर्मचारी यांनी येथे बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button