‘जर्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर | पुढारी

‘जर्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर

पुढारी ऑनलाईन

देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याचा परिणाम चित्रपटांच्या प्रदर्शनावर होऊ लागला आहे. अभिनेता शाहीद कपूरचा ‘जर्सी’ हा चित्रपट 31 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता; पण ऐनवेळी निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकले आहे. याशिवाय अक्षयकुमारचा ‘पृथ्वीराज’ 21 जानेवारी रोजी येणार आहे. त्याचा ट्रेलर सोमवारी येणार होता; पण ट्रेलर रीलिजही पुढे ढकलले आहे. त्यामुळे चित्रपटाची रीलिज डेटही पुढे जाऊ शकते. तथापि, दिग्दर्शक एस. एस. राजामौली मात्र त्यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट 7 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यावर ठाम आहेत. तसेच राधे श्याम, पृथ्वीराज आणि अटॅक हे चित्रपट जानेवारीत लागोपाठच्या आठवड्यात येत आहेत.

Back to top button