पिंकीचा विजय असो : ‘हा’ बालकलाकार झळकणार दिप्याच्या भूमिकेत | पुढारी

पिंकीचा विजय असो : 'हा' बालकलाकार झळकणार दिप्याच्या भूमिकेत

पुढारी ऑनलाईन : आपल्या सुरांनी मोहिनी घातल्यानंतर बालकलाकार हर्षद नायबळ यांची आता मालिका विश्वात पदार्पण होणार आहे. छोट्या पडद्यावर १७ जानेवारी २०२१पासून रात्री ११ वाजता सुरु होणाऱ्या ‘पिंकीचा विजय असो’ या नव्या मालिकेत हर्षद दिसणार आहेत.

या मालिकेत तो पिंकी या मुख्य पात्राच्या भावाची भूमिका साकारणार आहे. दिप्या असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून पिंकी आणि पिंकीची लहान बहिण निरीला नेहमी साथ देणारा असा हा लाडका भाऊ आहे. वयाने लहान असला तरी तितकाच समंजस आणि वडिलांच्या मेहनतीची जाण असलेला हा दिप्या.

हर्षदला गाण्याची आवड तर आहेच. मात्र, या मालिकेच्या निमित्ताने त्याची अभिनयाची आवडही जोपासली जाणार आहे. पिंकीचा विजय असो ही त्याची पहिलीच मालिका असून तो या भूमिकेसाठी खुपच उत्सुक आहे.

सेटवर हर्षद सर्वांचा लाडका असून तो आपल्या गाण्याने सर्वांचच मनोरंजन करत असतो. यामुळे आगामी ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. याआधीच्या ‘सूर नवा ध्यास नवा’चा शोमध्ये हर्षदने आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button