पुणे : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आक्रोश आंदोलन | पुढारी

पुणे : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आक्रोश आंदोलन

पुणे, पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन विनापरवाना होत असल्याने पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यापासून रोखले. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला.जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत अहिनवेवाडी येथील कर्मचारी प्रकाश शिवराम गोंदे यांनी 25 नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना त्रास देणाऱ्या सरपंच व उपसरपंच यांच्याविरोधात कडक कारवाई करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कॉम्रेड ज्ञानोबा घोणे, राजेंद्र वाव्हळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे, आत्महत्या केलेले कर्मचारी प्रकाश गाेंदे  यांच्या कुटुंबातील सदस्याला कामावर घ्यावं, कुटुंबाला पाच लाख रुपये आर्थिक मदत करावी, काम करूनही पगार दिला नाही, तसेच सरपंच आणि उपसरपंच यांनी चुकीचे कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना त्रास दिले जात होते, असा आरोप यावेळी करण्‍यात आला.

या आंदोलनात जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले आहेत. आत्महत्या केलेल्या गोंदे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी राजेंद्र कांबळे, अर्जुन राजने, सुजता आल्हाट, सुनीता लांडगे, संगीता बुचडे, अशोक गायकवाड, पंढरीनाथ चौधरी, अविनाश नेमाने यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले आहेत.

हेही वाचा

Back to top button