Mercedes-maybach : पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात आलिशान मर्सिडिझ कार दाखल | पुढारी

Mercedes-maybach : पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात आलिशान मर्सिडिझ कार दाखल

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात आलिशान मर्सिडिझ – मेबॅक एस ६५० ( Mercedes-maybach )  ही चिलखती कार दाखल झाली आहे. ही कार रेंज रोव्हर वोग आणि टोयोटा लँड क्रूझरच्या माध्यमातून अपग्रेड करण्यात आलेली आहे. ही नवी आलिशान नुकताच हैदराबाद हाऊसमध्ये दिसली होती. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यावेळी मोदी या कारमधून त्यांना भेटण्यासाठी गेले होते.

मर्सिडिझ – मेबॅक एस ६५० हे आधुनिक सुरक्षा कवच देणारे लेटेस्ट फेसलिफ्टेड मॉडेल आहे. या गाडीचा कमाल वेग १६० किलोमीटर प्रती तास इतका आहे. कारची बॉडी आणि खिडक्या ह्या स्टील कोअर बुलेटचा सामना करू शकतात. हे वाहन बॉम्ब प्रुफ रेटिंग प्राप्त असलेले आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातून प्रवास करणारे लोक टीएनटी स्फोटापासूनही सुरक्षित राहू शकतात. गाडीच्या खिडक्यांना पॉलिकार्बोनेटचे कव्हर आहे. ते अतिरिक्त संरक्षण प्रदान करते. तसेच गॅसचा हल्ला झाल्यास केबिनला स्वतंत्रपणे एअर सप्लाय होतो.

 

 

Back to top button