Ankita Lokhande birthday : अंकिताच्या साडीची किंमत पाहून व्हाल थक्क…

Ankita Lokhande birthday : अंकिताच्या साडीची किंमत पाहून व्हाल थक्क…
Published on
Updated on

मुंबई , पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande birthday ) आणि विकी जैन (Vicky Jain) हे कपल १४ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईत नुकतेच विवाहबंधनात अडकले. या विवाहातील प्रत्येत विधीचे अंकिताने फोटो सोशल मीडियाावर शेअर करून चाहत्यांना अपडेट दिले आहेत. याच दरम्यान अंकिताने १९ डिसेंबर २०२१ रोजी ३७ वा वाढदिवस साजरा केला. यातील विशेष म्हणजे, यावेळी अंकिताने नेसलेल्या साडीची किमंत पाहून चाहते अवाक झाले आहेत.

लग्नानंतरचा अंकिताचा (Ankita Lokhande birthday ) पती विकी जैनसोबतचा पहिला वाढदिवस होता. या निमित्ताने विकीने अंकिताचा १९ डिसेंबर रोजी वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. या दिवशी अंकिताने लाल रंगाच्या फुलांनी डिझाइन केलेली हिरव्या रंगाची साडी नेसली होती. या साडीची बॉर्डर सोनेरी रंगाची आहे. तिने त्यावर हिरेजडीत मंगळसूत्र घातले होते. यासोबत तिच्या हातात डायमंडची अंगठी घातली होती.

या लूकमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत होती. अंकिताच्या या साडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'अरे हा क्षण माझ्यासाठी खूप खास असून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार. तुमच्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर वर्षाव केल्याबद्दल आभार. तुम्ही कोण आहात हे सांगण्याचा उत्तम मार्ग म्हणजे साडी. ती नेसल्यावर तुम्हाला स्वतःची वेगळी ओळख सांगावी लागत नाही.' असे लिहिले आहे. याशिवाय तिने डिझायनर जेजे वालया यांना टॅग केलं आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच अनेक चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस करत अंकिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा लुक पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

अंकिताची साडी ७० हजार ५०० रुपयांची 

प्रसिद्ध फॅशन डिझायनर जेजे वालया यांनी डिझाइन केलेल्या या साडीची किंमत ७० हजार ५०० रुपये आहे. या साडीसोबत अंकिताने एक बेल्ट परिधान केला आहे. या बेल्टची किंमत ९ हजार ९०० रुपये आहे.

अंकिता लोखंडेचा १४ डिसेंबर २०२१ रोजी बॉयफ्रेंड विकी जैनसोबत मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाह पार पडला. या विवाहसोहळ्यातील फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नानंतर अंकिताने नुकतेच तिच्या नवीन घरात प्रवेश केला आहे. गृह प्रवेशावेळी तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news