देहू नगर पंचायतीसाठी 74.97 टक्के मतदान | पुढारी

देहू नगर पंचायतीसाठी 74.97 टक्के मतदान

दिवसभर शांतताप्रिय वातावरण; अनुचित प्रकार नाही, पोलिसांचा चोख बंदोबस्त

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : देहू नगरपंचायतीसाठी पहिलीच निवडणूक मंगळवारी (दि. 21) पार पडली. निवडणुकीत 74.97 टक्के मतदान झाले. सात वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या होत्या; परंतु ती निवडणूक ग्रामपंचायतीची शेवटची निवडणूक ठरली.

त्यामुळे या वर्षी प्रथमच निवड प्रकिया समजून घेणे अवघड झाले होते; परंतु मतदार मात्र खूश होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय अस्वले यांनी काम पाहिले, तर असून डॉ. प्रशांत जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

पुणे : कोर्ट केस फाईल ठेवली दलालाकडे! हवेली तहसील कार्यालयात भयंकर प्रकार

एकूण पस्तीस मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. मंगळवारी सकाळी 7.30 वाजता मतदान सुरू झाले. दुपारी 3.30 पर्यंत 45% मतदान झाले. त्यात 3425 पुरुष आणि 3082 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदान 6507 झाले.

दुपार नंतर हळूहळू मतदारांची गर्दी वाढू लागली. मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा 74.97% एवढे मतदान झाले.

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलची पुन्हा एन्ट्री?

5649 पुरुष व 5168 महिलांनी मतदान केले. एकूण 10 हजार 817 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. इव्हीएम यंत्रात उमेदवारांचे भवितव्य बंद झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत आहे. मात्र, निकालासाठी थोडे थांबावे लागणार आहे. 18 तारखेला आरक्षित जागांची सोडत काढण्यात येणार आहे.

धुळे मनपा पोटनिवडणुकीत भाजपच्‍या आरती पवार विजयी

ही नगर पंचायतीसाठी पहिलीच निवडणूक असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा देहूत तैनात करण्यात आला होता. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मतदानासाठी एकूण 3 पोलिस निरीक्षक, 14 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक आणि 73 अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली होती. एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

Back to top button