Gehraiyaan Movie : दीपिका पादुकोणच्या नव्या चित्रपटाची चर्चा - पुढारी

Gehraiyaan Movie : दीपिका पादुकोणच्या नव्या चित्रपटाची चर्चा

पुढारी ऑनलाईन

दिग्दर्शक शकुन बत्राचा आगामी चित्रपट गहराईयाची (Gehraiyaan Movie) सध्या चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणादेखील करण्यात आलीय. दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर या चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. (Gehraiyaan Movie)

गुंतलेल्या नात्यातील ‘गहराईया’

शकुन बत्राच्या जूस्का फिल्म्सच्या सहकार्याने धर्मा प्रोडक्शन्स आणि वायकॉम१८ स्टुडिओजने मिळून चित्रपटाची निर्मिती केलीय. हा चित्रपट एक रिलेशनशिप ड्रामा आहे. आधुनिक नाते आणि एखाद्याच्या आयुष्य़ा मार्गावर नियंत्रण ठेवण्याची ही कहाणी आहे.

गहराईयामध्ये दीपिका, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर २५ जानेवारीपासून २४० देशांहून अधिक देशांमध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर होईल.

पादुकोनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचे काही फोटो शेअर केले आहेत. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जे फोटो शेअर केली आहेत. त्यावरून स्पष्ट झालं आहे की, ती आपल्या आगामी चित्रपटाविषयी घोषणा करणार आहे. दीपिका पादुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. त्यांनी चित्रपटाचे काही बिहाईंड द सीन्सचे फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी ऑगस्टमध्ये पूर्ण झाले आहे.

करण जोहर म्हणाला…

या चित्रपटाविषयी करण जोहर म्हणाला, “गहराईया आधुनिक नात्यांचं वास्तविक चित्रण आहे. शकुन बत्राने मानवी भावनांची गुंतागुंत चित्रित करण्याचा प्रयत्न केलाय. त्य़ाची मेहनत, कलाकारांचा प्रामाणिकपणा आणि दमदार परफॉर्मन्सने मिळून चित्रपटाला एक चांगली स्टोरी बनवलंय.”

सुपरहिट चित्रपट कपूर ॲण्ड सन्सनंतर दिग्दर्शक शकुन बत्रा गहराईया चित्रपट आणताहेत. ते म्हणाले, “गहराईयां माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नाही. हा मावाच्या भावनांचा प्रवास आहे. आधुनिक एडल्ट रिलेशनशिपचा एक आरसा आहे. आपलं प्रत्येक पाऊल, आपले निर्णय, आजूबाजूच्या लोकांचे जीवन कसे प्रभावित करते. मी जगभरातील प्रेक्षकांची दाद मिळवण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

Gehraiyaan teaser
View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

Back to top button