बिग boss marathi 3: मीनल म्हणते, जयने अजिबात Creativity दाखविली नाही | पुढारी

बिग boss marathi 3: मीनल म्हणते, जयने अजिबात Creativity दाखविली नाही

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या ( बिग boss marathi 3 ) घरामध्ये आज मीनल आणि सोनाली तर दुसरीकडे उत्कर्ष आणि मीरा यांच्यामध्ये चर्चा होताना दिसणार आहे. मीनल आणि सोनाली या दोघी विकास आणि जयबद्दल बोलताना दिसणर आहेत. तर मीरा उत्कर्षला नक्की कोणाबद्दल बोलत आहेत हा प्रश्नच विचारत आहे. यानंतर मीनल सोनालीला कार्यादरम्यान तिला जयची वा विकासची creativity दिसली नाही असे सांगताना दिसणार आहे.

बिग बॉस मराठीच्या ( बिग boss marathi 3 ) घरात मीरा आणि उत्कर्षशी बोलताना दिसणार आहे. मुद्दे नव्हते माहिती तर ऐकलंस का तू. जेव्हा गोष्टी ऐकत होतास ? तेव्हा त्याच -त्याच गोष्टी नवीन असं काही निघत नव्हतं. कित्येक गोष्टी तर म्हणजे, असं काय बोलंत आहेस, काहीही बोलतो आहे का? असंच ती बोलत होती.

तर दुसरीकडे मीनल सोनालीशी बोलताना दिसणार आहे. मीनल सोनालीला तिचे मत सांगणार आहे की, मी हे म्हणते as a individual मला कुठेतरी विकास पाटील खरंच वीक वाटतं होता. जितके लोकं टास्कमध्ये perform करतं होते. टास्कमध्ये किंवा वेशभूषेत तो व्यवस्थित करू शकला नाही. जेव्हा टीम टास्क होता आणि तुमच्यासोबत खेळत होता तेव्हा पण कुठे एफर्ट टाकत होता तो? आणि जयसुध्दा तितके चांगले एफर्ट्स नव्हता टाकत. कोणती creativity दाखविली, काय वेगळेपण दाखवलं ? मला दिसलं नाही ते… असे तिने म्हटले आहे.

यामुळे या शोत पुढे काय होणार यांची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे पुढाल भागात पाहा. तेव्हा पाहा राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button