Viral Video : घोड्याची सटकली अन् त्यानं नवऱ्याला घेऊन धूम ठोकली!

Viral Video : एक आवाज झाला आणि नवऱ्याला घेऊन घोडा फरार; वऱ्हाडी मंडळी फक्त बघत राहिली
Viral Video : एक आवाज झाला आणि नवऱ्याला घेऊन घोडा फरार; वऱ्हाडी मंडळी फक्त बघत राहिली

पुढारी ऑनलाईन डेस्क

लग्न म्हटलं की बॅण्ड बाजा, डीजे, घोडा, वरात, फटाके आणि मान-पान असं चित्र सर्रास पहायला मिळतं. मौज-मजा तसेच लग्न एकदाच होतं या समजुतीपायी मोठी हौस करायची. यासाठी काही लग्नसमारंभात कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी केल्याचेही आपण पाहतो.

एका बाजूला हौसेला मोल नसणारे नाना प्रकार आपण पाहिले आहेत. तर दुसरीकडे या हौसेपायी अनेकांची चांगलीच फजिती झाल्याचेही आपल्या दिसून येते. बऱ्याचदा वर-वधू एकमेकांना हार घालताना झालेली फजिती, लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाने सर्वांसमोर केलेला डान्स, वरातीत नवरा मुलग्याच्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांनी केलेली फजिती आपण सर्वांनी पाहिलीय.

मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका लग्नातील व्हिडिओमुळे नवरदेवाची झालेली एक वेगळीच फजिती पहायला मिळाली. यामध्ये फटाक्याचा बार उडताच घोड्याने नवऱ्यासकट धूम ठोकली. अन् उपस्थित मित्र, नातेवाईक तसेच वऱ्हाडी मंडळींनाही बघ्याची भुमिका घ्यावी लागली.

आता तुम्हीच बघा खालील व्हिडिओमध्ये कशी झाली नवरदेवाची फजिती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news