Sara Tendulkar : शुबमनला सोडून ‘या’ व्यक्तीची मॅच पाहायला गेलेली सारा तेंडुलकर ट्रोल!

Sara Tendulkar : शुबमनला सोडून ‘या’ व्यक्तीची मॅच पाहायला गेलेली सारा तेंडुलकर ट्रोल!
Sara Tendulkar : शुबमनला सोडून ‘या’ व्यक्तीची मॅच पाहायला गेलेली सारा तेंडुलकर ट्रोल!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (sara tendulkar) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओने मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. नेटकरी आणि चाहते तिच्या फोटो व्हिडिओवर लाईक्स, शेअर, कमेंटचा पाऊस पाडतात. पण सध्या साराला सोशल मीडियावर ट्रोल केल्याचे पहायला मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सारा तेंडुलकर (sara tendulkar) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात जनाईसोबत दिसली. जिथे दोघांनी हैदराबादला जात असल्याचे सांगितले. खरंतर १० डिसेंबरपासून बॉलीवूडचा अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची बहीण कृष्णा श्रॉफ हैदराबादमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. मॅट्रिक्स फाईट नाईट (Matrix Fight Night) असे या कार्यक्रमाचे नाव आहे.

सारा तेंडुलकरचा (sara tendulkar) हैदराबादला जाणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. ज्यावर काही चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका बाजूला सोशल मीडियावर शुबमन गिलसोबत सारा तेंडुलकरचे नाव जोडले जात आहे. एका चाहत्याच्या व्हिडिओवर कमेंट करताना त्याने 'शुबमनची फसवणूक झाली आहे' असा सवाल केला आहे.

सोशल मीडियावर क्रिकेटर शुबमन गिलसोबत सारा तेंडुलकरचे (sara tendulkar) नाव जोडले जाते, ज्यावरून दोघेही चर्चेत असतात. शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. एवढेच नाही तर दोघेही एकमेकांच्या कुटुंबियांना फॉलो करतात. दुसरीकडे, सारा शुबमनची बहीण सेहनील गिलला इन्स्टाग्रामवर फॉलो करते.

MFN कार्यक्रमाची ही ७ वी आवृत्ती आहे. टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ हे देखील या कार्यक्रमाचे सहमालक आहेत. यावेळेस हा कार्यक्रम प्रदीर्घ काळानंतर भारतात आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांची मुलगी सहभागी होणार आहे. अलीकडेच, सारा तेंडुलकरच्या एका जाहिरातीचा व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये ती बनित संधू आणि तान्या श्रॉफसोबत दिसत आहे.

सारा तेंडुलकर आणि आशा भोसले यांची नात जानाई चांगल्या मैत्रीणी आहेत. दोघीही एकमेकांच्या जिम पार्टनरही आहेत. साराचे बॉलिवूड कनेक्शनही कोणापासून लपलेले नाही. साराच्या सोशल मीडियातील फोटो, व्हिडिओंवर बॉलीवूडच्या वेगवेगळे सेलिब्रिटींच्या नेहमीच कमेंट्स करतात. 'बेबी डॉल फेम' प्रसिद्ध गायिका कनिका कपूर देखील सारा तेंडुलकरची चांगली मैत्रीण आहे. काही दिवसांपूर्वी साराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कनिकासोबत डेट नाईटचा फोटोही शेअर केला होता. याशिवाय अलीकडेच इंस्टाग्रामवर दिसलेल्या तिच्या जिम लूकचेही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी खूप कौतुक केले होते.

मुंबई विमानतळावर स्पॉट होण्यापूर्वी, सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका फोटोसह गाणे शेअर केले. या गाण्यातून तिने तिच्या घरी परतण्याच्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे सारा बराच काळ लंडनमध्ये होती आणि नुकतीच हैदराबादहून मुंबईला रवाना झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news