कृती सेनॉन हिने घेतलं बिग बींचं घर, भाडं ऐकून चक्कर येईल!

अमिताभ बच्चन यांनी कृतीला भाड्याने दिलं घर
अमिताभ बच्चन यांनी कृतीला भाड्याने दिलं घर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईऩ डेस्क

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अभिनेत्री कृती सेनॉन (Kriti Sanon) हिला मुंबईमध्ये आपला एक डुप्लेक्स फ्लॅट भाड्याने दिला आहे. कृती सेनॉन हिने हे घर २ वर्षांसाठी घेतले आहे. एका वेबसाईटने ही माहिती दिलीय की, इंडेक्सटॅप डॉट कॉमला मिळालेल्या रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंटने ही माहिती मिळाली आहे.

कृती सेनॉन
कृती सेनॉन

हे घर अंधेरी वेस्टमध्ये लोखंडवाला रोडवर अल्टेंटिस बिल्डिंगच्या २७ आणि २८ व्या मजल्यावर आहे. त्याचे भाडे महिन्याला १० लाख रुपये आहे. सेनॉनने ६० लाख रुपयांची डिपॉझिट दिली आहे. १२ नोव्हेंबर रोजी लिव्ह ॲण्ड लायसेंस ॲग्रीमेंट झालं . या कागदपत्रांमध्ये दाखवण्यात आलंय की- १६ ऑक्टोबर, २०२१ ते १५ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत २४ महिन्यांसाठी हे घर भाड्याने देण्यात आलंय. पण, अद्यापपर्यंत अमिताभ आणि कृती दोघांकडून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कृती सेनॉन
कृती सेनॉन

सेनॉनने २०१४ मध्ये तेलुगु सायकोलॉजिकल थ्रिलर नेनोक्कादीन मधून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. तिने बरेली की बर्फी, लुका चुप्पी, मिमी आणि हम दो हमारे दो यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

या सेलिब्रिटींनी तगड्या किंमतीला रेंटवर घेतलं घर

अभिनेत्री सनी लिओनने एका अपार्टमेंटच्या १२ व्या मजल्यावर रजिस्टर केलं होतं. तिने २८ मार्च, २०२१ रोजी १६ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं.

कृती सेनॉन
कृती सेनॉन

तनु वेड्स मनु आणि झिरो सारखे चित्रपटांचे निर्माते आनंद एल राय यांनी एक डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केलं होतं.

अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे बॉलीवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत. ज्यांनी आपले बंगले तगड्या किंमतील रेंटवर दिले आहेत. सलमान खाननेदेखील मध्यतंरी गॅलेक्सी अपार्टमेंटशिवाय बांद्रामध्ये एक डुप्लेक्स रेंटवर घेतलं. या डुप्लेक्ससाठी तो प्रत्येक महिन्याला ८.२५ लाख रुपये मोजतो. त्याशिवाय सलमान खानने आणखी एक प्रॉपर्टी ११ लाख रुपयांच्या रेंटवर घेतली आहे.

कृती सेनॉन
कृती सेनॉन

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news