Katrina-Vicky Wedding: 'हा' आहे कॅट-विक्कीच्या लग्नातील मेन्यू | पुढारी

Katrina-Vicky Wedding: 'हा' आहे कॅट-विक्कीच्या लग्नातील मेन्यू

पुढारी ऑनलाईन

कॅटरीना कैफ आणि विक्की कौशल (Katrina-Vicky Wedding) यांच्या विवाह साेहळ्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आता पाहुण्‍यांसाठीच्‍या मेन्यूची लिस्ट समोर आलीय.  ७ डिसेंबर रोजी लग्‍न विधी (Katrina-Vicky Wedding)सुरू झाले आहेत. देश-विदेशातून पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या रॉयल वेडिंगमध्ये येणाऱ्यांसाठी शाही व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत वेन्यू सिक्स सेंस हॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. आता लग्नात मेन्यू काय काय असणार, याची लिस्ट समोर आलीय.

देशी – परदेशी दोन्ही प्रकारची व्यंजने

लग्नात देशी परदेशी लोकांसाठी वेगवेगळी व्यंजने असणार आहेत. कचौरी चाट, कबाब आणि राजस्थानी डिश असणार आहे. शिवाय ५ थरांचा केकदेखील असणार आहे.

चौपाटी- कचौरी, दही भल्ला, फ्युजन चाट, लाईव स्टॉल, पाणीपुरीचीही व्यवस्था करण्यात आलीय.

नार्थ इंडियन फूड- कबाब, मछली, थाळी.

राजस्थानी व्यंजन- दाल बाटी चूरमा ट्रेडिशनल डिशेस.

मिठाई – सर्व प्रकारच्या मिठाई.

इटलीहून आला केक शेफ

असं म्हटलं जात आहे की, लग्नाचा ५ थरांचा केक असेल. यासाठी इटलीहून स्पेशल शेफला बोलावण्यात आलं आहे.

पाहुण्यांची लांबलचक यादी

कॅट-विक्कीचा लग्नाचा कार्यक्रम तीन दिवस आहे. ७ तारखेला संगीत झालं. ८ तारखेला मेहंदीचा कार्यक्रम आहे. लग्न ९ तारखेला असेल. सवाई माधोपुर जिल्ह्यातील चौथे बरवाडा किल्ल्यातील सिक्स सेंस हॉटेलमध्ये हे शाही लग्न पार पड़ेल. हॉटेलचा खर्च जवळपास ६ ते ७ लाख रुपये प्रती दिवस सांगितलं जात आहे. लग्नात एकूण १२० पाहुणे सहभागी होणार आहेत.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

Back to top button