हार्दिक पांड्याची पत्नी नताशाची पुन्हा पोस्ट; ‘मी वाट नाही पाहू शकत..’ | पुढारी

हार्दिक पांड्याची पत्नी नताशाची पुन्हा पोस्ट; 'मी वाट नाही पाहू शकत..'

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही काळापासून नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या वेगळे होण्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान, नताशाची इन्स्टा स्टोरी इशारा करते की, दोघांच्या मध्ये सर्वकाही ठिक झाले आहे. तर या कपलनेदेखील याविषयी उघडपणे काही सांगितलेले नाही. दरम्यान, नताशाने आणखी एका इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. या कोटमध्ये लिहिलंय – ‘इतक्या सर्व गोष्टी स्टाईलमध्ये परत आणण्यासोबत आता प्रतीक्षा करू शकत नाही. नैतिकता, सन्मान आणि इंटेलिजेन्स पुन्हा एकदा…’ आता नताशाच्या या पोस्टवरून सोशल मीडिया युजर्स अनेक अर्थ काढत आहेत.

अधिक वाचा-

मुलासोबत टाईम स्पेंड करताना दिसली नताशा

नताशाने अगस्तय सोबत ‘हॅप्पी मोमेंट्स’चा एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. नताशाने काही फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले होते. ज्यामध्ये ती आपल्या मुलासमवेत दिसली. दोघांचा पहिला फोटो सोबत दिसत असून दुसऱ्या फोटोत ती आपल्या डॉगी सोबत दिसते. नताशाने आपली एक हॉट मिरर सेल्फी देखील पोस्ट केली आहे. एका अन्य व्हिडिओमध्ये ती जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे.

अधिक वाचा-

हार्दिक-नताशाने पुन्हा केलं लग्न

हार्दिक आणि नताशाने ३१ मे, २०२० रोजी लग्न केले होते. याआधी हार्दिकने नताशाला नव्या वर्षाच्या निमित्ताने प्रपोज केलं होतं. फोटोज शेअर करून कपलने आपल्या साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये दोघांनी इंटीमेट वेडिंग केलं.

अधिक वाचा-

लग्नाच्या तीन वर्षांनंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी पुन्हा हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजाने लग्न केले होते. आता दोघांच्या मध्ये वाद झाल्याचे म्हटले जात आहे. हार्दिक-नताशा यांच्यापैकी कुणीही खुल्यापणाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by @natasastankovic__

Back to top button