सबा आजादला काम मिळेना! पोस्ट लिहून हृतिक रोशनला डेट केलं म्हणून | पुढारी

सबा आजादला काम मिळेना! पोस्ट लिहून हृतिक रोशनला डेट केलं म्हणून

पुढारी ऑनलाईन डेस्क : सबा आजाद आणि हृतिक रोशन एकमेकांना डेट करत आहेत. अडीच वर्षे ते रिलेशनशीपमध्ये आहेत. आता सबा आजाद एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सबाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून सांगितले आहे की, अडीच वर्षे झाले तिला काम मिळत नाहीये. तिने खुलासा केला आहे की, हृतिकला डेट केल्यानंतर तिला वॉईस ओवरचे काम मिळत नाहीये. तिने एक पोस्ट शेअर केली आहे आणि सांगितले आहे की, कशा प्रकारे तिला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं.

सबाने पोस्टमध्ये काय म्हटलंय?

मी माझ्या कामावर परतलीय. जवळपास दोन वर्षांनंतर व्हॉईस ओवर करत आहे. पण मी दोन वर्षांनंतर परतले आहे. आपल्यामधील काही लोकांना माहिती असावं तर काहींना माहिती नसावी. मी अनेक वर्षांपासून व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम करत होते. मी १०० हून अधिक जाहिरातीसाठी डबिंग केली आहे. व्हॉईस डबिंग करणे मला खूप अधिक पसंद आहे.

मला अऩेक जाहिरातीत थूप चांगल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाली. मला अडीच वर्षापूर्वी प्रत्येक महिन्याला ६ त ८ व्हॉईस आर्टिस्टचे काम मिळायचे. आता एकदेखील मिळत नाही. हो. तुम्ही बरोबर ऐकलात.

एक दिवस मी उठले आणि मला अनुभव आळा की, मी अनेक महिन्यांपासून कोणतेही काम केलेले नाही. ते महिने कधी वर्षात बदलले समजलं नाही. मी कधीही कोणलाही कोणत्या कामासाठी नकार दिलेला नव्हता. मी कधी म्हटले नाही की, मला काम नकोय वा मी काम सोडत आहे. तर असं काय झालं की, मला काम मिळणेच बंद झाले. मला कोणतीही कल्पना नव्हती की काय घडत होतं.

एक दिवस मी जुन्या दिग्दर्शकाला भेटले. ज्यांच्यासोबत मी आधी काम केलं होतं. मी त्यांना विचारले की, तुम्ही मला का कामासाठी का बोलवत नाही? तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर पाहून मला खूप आश्चर्य वाटले. तू जीवनात जिथे आहेस, त्यावरून आम्हाला वाटलं की, आता तू व्हॉईस ओव्हरसारखे काम का करशील? त्यांचे हे स्पष्ट म्हणणे होते की, मी एक प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत आहेत तर मी कशासाठी काम करेन. याचा अर्थ मला कामाची आवश्यका नाही, कारण मी एका प्रसिद्ध व्यक्तिला डेट करतेय.

Back to top button