कॅमेरासमोर तयार होताना Alia Bhatt चा डीपफेक व्हिडिओ व्हायरल; संतापले फॅन्स 

आलिया भट्ट डीपफेक व्हिडिओ
आलिया भट्ट डीपफेक व्हिडिओ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुन्हा एकदा आलिया भट्टचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आलिया कॅमेऱ्याच्या पुढे तयार होताना दिसते. या व्हिडिओला पाहून फॅन्सचा संताप अनावर झालाय. फॅन्स या व्हिडिओवर कॉमेंट करून सांगत आहे की, असे करणे, बेकायदेशीर आहे. याआधीही आलियाचा एक डिपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आलिया भट्टचा एक डीपफेक व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे.

अधिक वाचा – 

या व्हिडिओमध्ये तिचा गेट रेडी विथ मी (GRWM) दाखवण्यात आलं आहे. आलिया कॅमेरासमोर तयार होत आहे. हा व्हिडिओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत २० मिलियन व्ह्युव्ज मिळाले आहेत.

अधिक वाचा – 

आलिया भट्टच्या व्हिडिओबद्दल युजर्सचे म्हणणे आहे की…

व्हिडिओमध्ये आलिया काळ्या रंगाच्या कुर्तीमध्ये तयार होताना आणि मेकअप करताना दिसते. अनेक नेटकऱ्यांनी एआयच्या वाढत्या प्रयोगावर चिंता व्यक्त केली आहे. एका युजरने कॉमेंट केलं आहे, 'आधी मला वाटलं की, आलिया भट्ट आहे मग मी खूप जवळून पाहिलं, ही आलिया नाही.' एका दुसऱ्या युजरने कमेंट केलं की, 'एआय खूप खतरनाक आहे.' एका अन्य युजरने कॉमेंट केलं- 'काय मुर्खपणाचे आहे, मस्क यांनी खरं सांगितलं होतं, एआय वास्तवात सर्वकाही जिंकत आहे.'

अधिक वाचा – 

आधीही आलिया भट्टचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल

याआधीही आलिया भट्टचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याआधीही मेमध्ये आलियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याशिवाय, रश्मिका मंदाना, काजोल आणि कॅटरीना कैफ यासारख्या अभिनेत्री देखील डीप फेकची शिकार झाली आहे.
आमिर खानचा एक डीप फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी यावर कारवाई केली आणि एफआयआर दाखल झाल्यानंतर आमिर खानच्या प्रवक्त्याने देखील स्टेटमेंट आणि स्पष्टीकरण देत व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sameeksha Avtr (@unfixface)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news