पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय लीला भन्साळींची भाची शर्मीन सेगलने 'हिरामंडी : द डायमंड बाजार' मध्ये आलमजेबची भूमिका साकारली होती. पण, नॉन ग्लॅमरस फेस आणि ॲक्टिंगवरून शर्मिन सेगलला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. काही लोकांनी तिला एक्सप्रेशनलेस म्हटलं. तिच्या अभिनयाची खिल्लीदेखील उडवली. आता अखेर तिने मौन सोडले आहे. तिने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तिने म्हटलं की, आपल्या या भूमिकेसाठी खूप सारे पॉझिटिव्ह कॉमेंट्सदेखील मिळाले आहेत. पण, ज्यांनी केवळ निगेटिव्ह कॉमेंट्स केले, त्यांची मी आभारी आहे.
अधिक वाचा –
ट्रोलिंग आणि नकारात्मक टिप्पण्यांचा सामना करणारी शर्मीन सेगलने ट्रोल करणाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे. पण, ती केवळ सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. एका खास मुलाखतीत, तिने दखल घेतल्याबद्दल आणि तिची कला सादर करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ती म्हमाली, शेवटी, लोक माझ्याकडे लक्ष देत आहेत. त्याबद्दल मी आभारी आहे. माझी कला लोकांना पाहता आली, यासाठी मला ही संधी मिळाली याबद्दल मी कृतज्ञ आहे," शर्मीन म्हणाली.
अधिक वाचा –
शर्मिन सेगल म्हणाली, 'एक क्रिएटिव पर्सनच्या नात्याने ही गोष्ट स्वीकारणे गरजेचे आहे की, अखेर आमचे प्रेक्षकही राजा आहे. त्यांना आपला विचार मांडण्याचा पूर्ण हक्क आहे, मग ते पॉझिटिव्ह असो वा निगेटिव्ह. एक वेळ अशी होती की, जेव्हा मी खूप साऱ्या रिव्ह्युव्जवर लक्ष देत नव्हते. मग मला हळूहळू वाटलं की, मीदेखील खूप सर्व प्रेम गमवते., जे मला मिळत आहे. आता मी त्याकडे लक्ष देणं सुरु केलं आहे. मागील काही दिवसांमध्ये मला हे सर्व पाहायला मिळालं आहे.'
अधिक वाचा –