Janhvi Kapoor : जान्हवी बीएफ शिखरसोबत युरोपच्या रस्त्यावर हातात-हात घालून स्पॉट

Janhvi Kapoor
Janhvi Kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची सुपरस्टार आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे. जान्हवी तिच्या बॉयफ्रेंड शिखर पहाडियाला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. रिलेशन कन्फर्म झाल्यानंतर जान्हवी पुन्हा एकदा बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने शिखरसोबतचे युरोपमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी कपूर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत युरोपमध्ये खूपच मौजमस्ती करताना दिसत आहे. याशिवाय दोघेजण एकमेंकांच्या हातात-हात घालून युरोपच्या रस्त्यावरही फिरताना क्यूट दिसतात. हे क्यूट कपलला आनंदात पाहून चाहते भारावून गेलं आहेत.

यावेळी जान्हवीने लाल-व्हाईट रंगाच्या मिनी शॉर्ट ड्रेस आणि येलो कलर मिनी शॉर्ट- ब्लॅक कलरच्या लॉग आउटफिट परिधान केला होता. या फोटोत ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यावेळी खस करून एका फोटोत तिने शिखरचा हातात-हातल घेवून फिरताना- हसताना दिसत आहे. तर तिच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य दिसून येत आहे. मोकळ्या केसांच्या स्टाईलसोबत तिने लाईट मेकअप केला होता. तर शिखर पाहाडियाने व्हाईट टी-शर्टसोबत व्हाईट पँट आणि तपकिरी रंगाचे जॅकेट परिधान केलं होतं. हे फोटो शेअर करताना जान्हवीने लिहिलं आहे की, "हा सर्वात चांगला वीकेंड होता. खूप प्रेम आणि आठवणींसाठी धन्यवाद."

उद्योगपती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट याच्या दुसऱ्या प्री-वेडिंग पार्टीला जान्हवी कपूर आणि शिखर गेले होते. या पार्टीतही दोघांनी खूपच मौजमस्तीसोबत धमाल केली आहे. दरम्यान जान्हवीनं स्वत: च्या हाताने शिखरला जेवण भरवलं आहे.

हेही वाचा 

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news