‘बंगळुरु रेव पार्टी’ प्रकरणात अभिनेत्री हेमा अटकेत, ड्रग टेस्टमध्ये फेल

Telugu actress Hema
Telugu actress Hema

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलुगू अभिनेत्री हेमा हिला बंगळुरूमध्ये एका मोठ्या रेव्ह पार्टीत सहभागी झाल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली. नंतर हेमाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या पार्टीचे आयोजन इलेक्ट्रॉनिक सिटीच्या जवळील एका फार्महाऊसमध्ये १९ मे रोजी करण्यात आले होते.

अधिक वाचा-

केंद्रीय गुन्हे शाखेने चौकशीनंतर तिला ३ जून रोजी ताब्यात घेतले. १९ आणि २० मे रोजी इलेक्ट्रॉनिक सिटी येथील फार्महाऊसवर झालेल्या या पार्टीची एक टीप मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या टीमने २० मे रोजी फार्महाऊसवर छापा टाकलाय यामध्ये अभिनेत्री हेमासह १०३ लोकांना अटक केली. त्यापैकी ८६ जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे म्हटले आहेत.

अधिक वाचा-

हेमाच्या रक्ताचे नमुने तपासल्यानंतर त्यात ड्रग्जचे अंश आढळल्याचे म्हटले आहे. छाप्यामध्ये MDMA गोळ्या, हायड्रो कॅनॅबिस आणि कोकेनसह मोठ्या प्रमाणात अवैध पदार्थ मिळाले. अंमली पदार्थ विकणारे आणि पार्टी आयोजकांसह पाच जणांना अटक करण्यात आली. संबंधित घडामोडीमध्ये, आणखी एक तेलगू अभिनेता, आशी रॉय, वाढदिवसाची पार्टी असल्याचे मानून या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिल्याची कबुली दिली आहे.

अधिक वाचा-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news