‘पुष्पा 2’ मधील रॉकस्टार डीएसपीच्या गाण्यांचा धुमाकूळ, तुम्ही ऐकलं का?

Rockstar DSP and Rashmika -Allu Arjun
Rockstar DSP and Rashmika -Allu Arjun
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार रॉकस्टार डीएसपी यांच्या 'पुष्पा २ : द रुल' मधील 'पुष्पा पुष्पा' आणि 'द कपल सॉन्ग' या नवीन गाण्यांनी इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे. अल्लू अर्जुनचा समावेश असलेल्या 'पुष्पा पुष्पा'ने सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये १०० दशलक्ष व्ह्यूज आणि २.२६ दशलक्ष+ लाईक्सचा टप्पा ओलांडला आहे. तर 'द कपल सॉन्ग'ने अवघ्या काही दिवसांतच ५३M व्ह्यूज आणि १.१६ मिलियन लाईक्स मिळवले आहेत.

अधिक वाचा –

गाणी रिलीझ झाल्यापासून लाखो लोकांनी याला प्रेम दिलं. अलीकडेच एका जर्मन व्यक्तीने मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये 'पुष्पा पुष्पा' गाण्यावर व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही गाणी केवळ व्हायरल होत नाही तर ती अनेकांच्या आवडीची बनली आहेत. अलीकडेच 'पुष्पा पुष्पा'ने सर्वाधिक वाजलेल्या ५० तेलुगु गाण्याच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

अधिक वाचा –

१५ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या 'पुष्पा २' व्यतिरिक्त, त्याच्या संगीतमय उपक्रमांमध्ये सूर्याचा 'कंगुवा', अजित कुमारचा 'गुड बॅड अग्ली', राम चरणचा पुढील शीर्षक नसलेला चित्रपट, पवन कल्याणचा 'उस्ताद भगत सिंग', धनुषचा 'कुबेरा' यांचा समावेश आहे आणि नागा चैतन्यचा 'थंडेल' साठी काम करणार आहेत.

अधिक वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news