मल्याळम अभिनेता इंद्रनचा ‘जॅक्सन बाजार’ येतोय मराठी ओटीटीवर

जॅक्सन चित्रपट
जॅक्सन चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोटीशी गावं, खेडी, त्यांच्या सौंदर्याला आणि शांत रूपाला घेऊन सर्वांनाच कुतूहल असतं. मात्र गावात घडणाऱ्या गंभीर घटना कोणाच्याही लक्षात येत नाहीत. अशाच एका गावात घडणाऱ्या एका गंभीर घटणाची गडद बाजू दाखवणाऱ्या 'जॅक्सन बाजार' या चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ७ जून २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. मल्याळम चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारा ज्येष्ठ अभिनेता इंद्रन सदर चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे.

अधिक वाचा –

चित्रपटाची कथा जॅक्सन बाजारात राहणाऱ्या एका बँड वाजवणाऱ्या मित्रांभोवती फिरते. स्वप्नांचा पाठलाग करणारे हे मित्र नकळत एका गुन्हेगारी आणि हिंसाचाराच्या जाळ्यात अडकतात. त्यांना जमिनीच्या वादावरून त्यांची मैत्री, त्यांचा बँड आणि त्यांचे जीवन नष्ट करण्याच्या धमक्या मिळू लागतात. चित्रपटात या छोट्या पण सर्वांच्या परिचयाच्या अडचणींचा सामना कसा रंगतो ते पहायला मिळणार आहे.

अधिक वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news