नर्गिस फाखरीने संदीप रेड्डी वंगा यांच्याबद्दल केला मोठा खुलासा

Nargis Fakhri
Nargis Fakhri

पुढारी ऑनलाईन डेस्क : इम्तियाज अलीच्या 'रॉकस्टार'मधून पदार्पण करणाऱ्या नर्गिस फाखरीने डेव्हिड धवन (मैं तेरा हिरो), शूजित सिरकार (मद्रास कॅफे) आणि रोहित धवन (डिशूम) यांसारख्या बॉलिवूडमधील काही दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. आता या अभिनेत्रीने अजून एक इच्छा व्यक्त करून दाखवली आहे आणि ती म्हणजे तिला तिच्या आगमी प्रोजेक्टसाठी एका प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम करण्याची इच्छा आहे.

अधिक वाचा –

या तीन दिग्गजांसोबत नर्गिसला करायच्या आहेत भूमिका

नर्गिसला भविष्यात संदीप रेड्डी वंगा, कबीर खान आणि राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करायचं आहे, असं तिने सांगितले आहे. संदीप रेड्डी वंगा बद्दल बोलताना नर्गिस म्हणते, मला 'ॲनिमल'मध्ये रणबीर कपूरचे पात्र ज्या पद्धतीने तयार केलं गेलं हे खूप आवडलं आहे. प्रत्येक सीन उत्तम शूट करून तो प्रेक्षकांना मोहित करणारा ठरला आहे आणि म्हणून हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला राजकुमार हिरानीचे 'मुन्ना भाई एमबीबीएस' आणि 'संजू' सारखे चित्रपट भावले आहेत जे हलक्या-फुलक्या क्षणांनी भरलेले आहेत आणि त्यांचे चित्रपट ज्या प्रकारे प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. ही बाब नक्कीच प्रशंसनीय आहे. शेवटी मला कबीर खान आणि 'एक था टायगर' सारख्या उच्च-ॲक्शन चित्रपटांबद्दलचा विचार करणाऱ्या दिग्दर्शकासोबत काम करायचं आहे.

अधिक वाचा –

नर्गिस शेवटची 'ततलुबाज' मध्ये दिसली असताना ती आगामी प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यासाठी तयारी करत आहे ज्याची ती या वर्षाच्या शेवटी घोषणा करेल.

अधिक वाचा – 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news