IPL 2024 : शाहरुखने केले किस; गौरीने दिली अशी पोज, सुहानाने कडकडून मारली मिठी

Shah Rukh Khan-Gauri Khan
Shah Rukh Khan-Gauri Khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगची ट्रॉफी आपल्या नावे केली. अखेरीस मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादला हरवून केकेआरने चेन्नईमध्ये हा विजय मिळवला. यावेळी केकेआरचा मालक, अभिनेता शाहरुख खान आणि जुही चावलादेखील दिसले. आता सोशल मीडियावर फोटोज व्हायरल होत आहेत. यावेळी शाहरुखचे संपूर्ण कुटूंब उपस्थित होते. ट्रॉफी जिंकल्यानंतर उत्सव साजरा करताना एसआरके आपले कुटूंब आणि मित्रांसोबत ट्रॉफी हातात घेऊन पोज देताना दिसला.

अधिक वाचा –

गौरी सोबत पोज देताना फोटो व्हायरल

पहिल्या फोटोत शाहरुख खान पत्नी गौरी खानसोबत आयपीएल ट्रॉफी हातात घेऊन पोज देताना दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्याची स्टाईल लक्ष वेधणारी आहे. दुसऱ्या फोटोत शाहरुख खान फॅमिलीसोबत आणि अनन्या पांडे, शनाया कपूर क्रिकेट ग्राउंडवर दिसत आहे. याशिवाय गौतम गंभीर किंग खानची मॅनेजर पूजा ददलानीसोबत पोज देताना दिसत आहे. त्यापैकी एकामध्ये केकेआरची सहमालक जुही चावलाही तिच्या पतीसोबत पोज देताना दिसत आहे. याशिवाय एका फोटोमध्ये किंग खान आपल्या कुटुंबासोबत आयपीएल ट्रॉफी हातात धरताना दिसत आहे. याशिवाय एक व्हिडिओही समोर आला आहे. सोबतच शाहरुख खानने आईपीएल २०२४ ची ट्रॉफी हातात घेत केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरसोबत फोटो क्लिक केला.

अधिक वाचा –

अन् सुहाना खानने कडकडून मारली मिठी

यावेळी सुहाना खानने भावूक होऊन कडकडून मिठी मारली. सुहाना खानने केकेआर जिंकल्यानंतर वडील शाहरुख खानला कडकडून मिठी मारली. यावेळी ती भावूक होऊन म्हणाली, की ती खूप खुश आहे. यावेळी शाहरुखने सुहाना, अबराम आणि आर्यन खानला देखील आलिंगन दिलं.

अधिक वाचा –

video-Varinder Chawla instagram वरून साभार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news