Kiran Mane : दिलासा देणारी गोष्ट; किरणची Cannesमध्ये चमकलेल्या पायल कपाडियासाठी खास पोस्ट | पुढारी

Kiran Mane : दिलासा देणारी गोष्ट; किरणची Cannesमध्ये चमकलेल्या पायल कपाडियासाठी खास पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रतिष्ठीत ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पायल कपाडियाच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ चित्रपटाने नुकताच ‘ग्रँड प्रिक्स पाल्मे डी’ पुरस्‍कार जिंकला आहे. यामुळे चाहत्यापासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यत सर्व स्तरातून पायल कपाडिया यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. याच दरम्यान शिवसेना आणि मराठी अभिनेता किरण माने यांनी देखील या सोहळ्यानंतर सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

किरण मानेविषयी ‘हे’ माहित आहे काय?

  • अभिनेते किरण मानेने मालिका आणि अनेक चित्रपटात भूमिका साकारली.
  • अभिनेते किरण मानेने काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात (शिवसेना) प्रवेश केला आहे.
  • ‘स्वराज्य’, ‘ऑनड्युटी २४ तास’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केलं आहेत.
  • ‘अपहरण’ या चित्रपटातून किरण मानेने हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले.

प्रोपोगंडा आणि सुमारांची सद्दी असण्याच्या काळ

अभिनेता किरण माने याने एक्स (x) टविटरवरून कान्समध्ये पायल कपाडियाच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ चित्रपटाने पुरस्कार जिंकल्याने आनंद व्यक्त केला आहे. ”आज भारतीय चित्रपट क्षेत्रात प्रोपोगंडा आणि सुमारांची सद्दी असण्याच्या काळात असं काही घडलं की, खूपच मनाला दिलासा मिळतो!, ही एक मनाला दिलासा देणारी गोष्ट घडली आहे.” असे या खास पोस्टमध्ये लिहिलंय आहे.

पायल कपाडियाविषयी खास पोस्ट

”जगभरातल्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पायल कपाडियाच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ चित्रपटाला सगळ्यात मानाचा ‘ग्रँड प्रिक्स पाल्मे डी’ पुरस्कार मिळाला. एवढेच नाही, तर फिल्म स्कूलसाठी असलेल्या शॉर्ट फिल्म स्पर्धेत चिदानंद नाईक यांच्या ‘द सनफ्लॅावर्स वर द फर्स्ट टू नो’ या शॉर्ट फिल्मला अवॉर्ड मिळालं. आणि तिसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, बल्गेरिअन दिग्दर्शक कॉन्स्टॅन्टीन बोयानोव यांच्या ‘द शेमलेस’ या चित्रपटातल्या भुमिकेबद्दल भारतीय अभिनेत्री अनुसूया सेनगुप्ताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भारतीय अभिनेत्रीला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. असे तो म्हणाला

छाया कदम हिचा अभिमान

तसेच सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’मध्ये आपली मराठमोळी अभिनेत्री… माझी जवळची मैत्रीण छाया कदम आहे, याचा खुप खुप अभिमान आहे. छाया, पुर्वीपासून मी तुला म्हणतो तू भारतीय सिनेमातली खुप महत्त्वाची अभिनेत्री ठरणार आहेस. आता ते सिद्ध होतेय. तुझे मनापासून अभिनंदन. असेही किरण माने म्हणाला आहे.

 

Back to top button