Omicron Update : ओमायक्रॉनची धास्ती; दक्षिण आफ्रिकेतून बंगळूरमध्ये आलेले ५ जण बेपत्ता

Omicron Update : ओमायक्रॉनची धास्ती; दक्षिण आफ्रिकेतून बंगळूरमध्ये आलेले ५ जण बेपत्ता

बंगळूर : पुढारी ऑनलाईन

Omicron Update : देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची धास्ती वाढत असतानाच कर्नाटकातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, दक्षिण आफ्रिकेतून बंगळूर येथे आलेले पाच प्रवाशी बेपत्ता झाले आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. बेपत्ता असलेले पाचजण २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान बंगळूरमध्ये दाखल झाले होते. पण प्रशासनाला त्यांचा निश्चित ठावठिकाणा सापडलेला नाही. या घटनेची गंभीर दखल घेत जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची बंगळूर महानगरपालिका प्रशासन शोध घेत आहे.

२८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेतून २३ जण बंगळूरमध्ये दाखल झाले होते. यातील ८ जणांना शोधून त्यांची चाचणी करण्यात आली. या सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली होती. पण अद्याप ५ जणांचा पत्ता लागलेला नाही, अशी माहिती बंगळूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आलेला एकजण ओमायक्रॉन पहिला रुग्ण होता. गेल्या गुरुवारी हा रुग्ण आढळून आला होता. या पार्श्वभूमीवर १ डिसेंबरपासून, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक 'जोखमीच्या' देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावरच RT-PCR चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम रद्द …

ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे संपूर्ण जग हादरले आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यात कोरोनाची नवी मार्गसूची जारी करण्यात आली आहे. केरळ आणि महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणार्‍यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल व कोरोनाच्या दोन डोसची सक्ती केली आहे. शिवाय शाळा-महाविद्यालयांतील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले असून विवाह सोहळ्यांमध्ये मास्कची सक्ती केली आहे.

Omicron Update : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची तिसरी लाट, मुले बाधित होण्याचे प्रमाण अधिक

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा कहर सुरु आहे, गंभीर बाब म्हणजे दक्षिण आफ्रिकेत लहान मुले आणि तरुण मुला-मुलींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आफ्रिकेत शुक्रवारी १६,०५५ नवे रुग्ण आढळून आले तर २५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची तिसरी लाट आली असून ५ वर्षाखालील आणि १५ ते १९ वयोगटातील मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जेव्हा एक हुजऱ्या शाहू महाराजांना सर्वांसमक्ष रागावतो | छत्रपती शाहू महाराज | Kolhapur

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news