Vilas patil : किरण माने यांची नवी पोस्ट व्हायरल- ‘आता सुट्टी नाय’

मुलगी झाली हो फेम किरण माने यांची नवी पोस्ट व्हायरल
मुलगी झाली हो फेम किरण माने यांची नवी पोस्ट व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क

मुलगी झाली हो फेम मराठमोळे अभिनेते Vilas patil : अभिनेते किरण माने सोशल मीडियावर सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी लिहिलेली एक पोस्ट खूप व्हायरल होतेय. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत एक भलीमोठी पोस्टही आहे. पोस्टमध्ये ते म्हणतात-काल रात्री साडेबारा एक वाजता पोवई नाक्यावर एकटा फिरत असताना पाचसहा पोरं "विलास पाटीSSSSल… विलास पाटीSSSSSSSल" असं वरडत आली. पाहा पुढं काय घडलं. (Vilas patil : किरण माने)

किरण माने सध्या 'मुलगी झाली हो' या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारत आहेत. त्यांचा अभिनय प्रेक्षकांनाही इतका भावला की, मानेंची क्रेझ वाढतचं गेली. त्यांनी साकारलेली विलास पाटील भूमिका प्रेक्षक माने म्हणून नव्हे तर विलास पाटील म्हणूनचं त्यांना ओळखू लागले. आता त्यांनी एक रात्री घडलेला किस्सा शेअर केलाय. ती पोस्ट त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलीय.

त्यांनी व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय-

काल रात्री १२.३० / १ वाजता पोवई नाक्यावर एकटा फिरत असताना पाचसहा पोरं "विलास पाटीSSSSल… विलास पाटीSSSSSSSल" असं आनंदानं वरडत आली.

…मध्यरात्री गाडी काढून सातारच्या सुनसान रस्त्यांवरनं फिरनं ह्यो माझा आवडता छंद !

…शुटिंगमधनं सुट्टी मिळाल्यावर पयला सातारा गाठतो मी. रात्री जेवन झाल्यावर मध्यरात्री नाक्यावर नायतर राजवाड्यावर गाडी लावायची…अन् रिकाम्या, शांत, निवांत पहुडलेल्या वरच्या आणि खालच्या रोडवरनं चालत फिरन्यात जे सुख हाय त्याचा नाद नाय करायचा.. जगात भारी भावांनो !!

असाच फिरत असताना काही पोरांनी मला बघितलं आन् गराडा घातला… "सर, तुमचं काम लै नादखुळा असतं.. माझी आई तुमची लै मोट्टी फॅन हाय. प्लीज तिच्याशी व्हिडिओ काॅलवर बोला. ती तुमाला बगून येडीच हुईल."…

मी म्हन्लं, "अरे एवढ्या रात्री कशाला उठवतोयस आईला?"…"नाय नाय सर, आता सुट्टी नाय." असं म्हणत कुणी आईला झोपेतनं उठवून सांगितलं, "आई, मला कोन भेटलं बघ."… तिकडून "आगंबयाSS ईलास पाटील?! नमस्कार ओ. तुमचा कार्यक्रम लै आवडतो आमाला." वगैरे सुरू झालं. मग कुनाच्या बहिनीशी, कुनाच्या वडिलांशी बोलून झालं…"सर तुमी सापडत नाय कधी..आता घावलाय तर सुट्टी नाय तुमाला."

…सेल्फी वगैरे झाल्यावर निरोप घेताना पोरांनी हात पुढे केले. म्हन्ले "सर, ऑटोग्राफ द्या.".. म्हन्लं, "हातावर?".. म्हन्ले, "मंग? आता सुट्टी नाय."… ऑटोग्राफ दिला.. म्हन्ले, "नाय, खाली 'विलास पाटील' लिहा.".. लिहून टाकलं.. त्याशिवाय 'सुट्टी' मिळालीच नसती मला. ?

हे सुरू असताना कुणीतरी व्हिडिओ काढला. आणि आज कुठनंतरी नंबर मिळवून मला व्हिडिओ पाठवला. म्हन्लं, "नंबर कुनी दिला???".. म्हन्ले "सातार्‍यात तुमचा नंबर मिळवनं आवघड हाय व्हय? मिळवला.. सुट्टी नाय..!" ??

– किरण माने

किरण हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

किरण यांचे परफेक्‍ट मिस मॅच हे नाटक गाजले. स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे आणि कान्हा अशा अनेक चित्रपटांतील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत. झी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत त्यांची भूमिका आहे.

तसेच ऑन ड्युटी २४ तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा चित्रपटांत ते दिसले. याशिवाय माझ्या नवऱ्याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news