sonali patil
sonali patil

बिग बॉस एम :“तिला त्यांनी वाळीत टाकल्यासारखचं केलं आहे”

Published on

पुढारी ऑनलाईन

बिग बॉस मराठीच्या (बिग बॉस एम) घरामध्ये टीम A जी आतापर्यंत सगळ्यात स्ट्रॉंग वाटत होती. ज्यामधले सदस्य एकमेकांची साथ काही झालं तरी सोडत नव्हते. ज्यांच्याकडे बहुमत होते. त्या टीममध्येच आता कुठेतरी वादविवाद आणि सदस्यांतील दुरावा संपायचं काही नावं घेत नाहिये असे दिसून येते आहे. मग तो टास्क असो वा घरातील वावर गायत्रीशी जय, मीरा, उत्कर्षने अबोला कायम ठेवला आहे. (बिग बॉस एम)

हे तिघे एकमेकांशी बोलताना दिसतात खरे पण, फक्त वाद घालताना आणि एकमेकांना टोमणे मारताना. उत्कर्ष, मीरा आणि जय यांची देखील गायत्रीवरुन चर्चा सुरू असते. तिने कसा विश्वासघात केला, कशी ती विकास आणि सोनालीच्या मागेपुढे करते आहे, बहुमत असतं तिकडेच खेळते आणि बरंच काही.

आज यावरूनच विकास आणि सोनालीची चर्चा बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये दोघं याविषयी खंत व्यक्त करताना दिसणार आहेत.
सोनाली विकासला सांगताना दिसणार आहे. जय मला म्हणत होता पहिल्यापासून तिला कसं खेळायचे आम्ही तिला गाईड करत आलो, तो त्याची बाजू मांडत होता. तर मी म्हटलं बरोबर आहे पण मी तुला तेच सांगते तुमच्या दोघांबद्दल तिची काहीच तक्रार नाहीये. कशाला त्या मुलीबद्दल…आधीच पाण्यात बघतात तिला, लागलं आहे तिच्या हाताला त्या गोष्टीचं काहीचं नाही त्यांना. तिचं जाऊदे या दोघांना.

विकास त्यावर म्हणाला, पण तिला त्यांनी असं पूर्णत: वाळीत टाकल्यासारखचं केलं आहे म्हणजे एक असतं ना की, आता काय ही जाणारच आहे. त्यामुळे काय आता आपल्याला उपयोग काही नाही त्या पध्दतीनेचं चालू आहे.

बघूया घरामध्ये अजून काय काय घडलं? तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सीझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news