Ankita Vicky pre-wedding : अंकिताच्या लग्नाची जोरात तयारी (फोटो) | पुढारी

Ankita Vicky pre-wedding : अंकिताच्या लग्नाची जोरात तयारी (फोटो)

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन लग्नबंधनात अडकत आहेत. (Ankita Vicky pre-wedding) त्यांचे प्री-वेडिंग फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अंकिता १४ डिसेंबर रोजी तिचा बॉयफ्रेंड विकी जैनशी लग्न करणार आहे. अंकिता लोखंडे-विकी जैन यांच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे.(Ankita Vicky pre-wedding)

नुकताचं या कपलला लग्नपत्रिका वाटताना पाहण्यात आलं होतं. आता दोघांची प्री-वेडिंग सेरेमनी सुरू झाली आहे. लग्नाच्या विविध विधींचे फोटो अंकिता-विकी जैनने शेअर केले आहेत. विकी जैनने मराठीत एक कॅप्शनदेखील लिहिलीय-मी आमच्यावर प्रेम करतो” BUT “पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त..❣❣#AnVikikahani.

अंकिताने काही दिवसांपूर्वी बॅचलर पार्टी ठेवली होती. या पार्टीत रश्मी देसाई आणि तिचे काही फ्रेंड्स सहभागी झाले होते.

जेव्हा अंकिताने तिच्या ३४ व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये विकीला बोलावलं होतं. तेव्हापासून अंकिता लोखंडे -विकी जैन यांच्या अफेअरची चर्चा रंगू लागली होती. पण, अंकिताने मौन साधले होते. परंतु, २०१९ रोजी विकीने अंकिता लोखंडेला प्रपोज केलं.

विकीसोबतचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

बॅचलर पार्टीनंतर दोघांच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या व्हिडिओमध्ये दोघांची चांगली बॉन्डिंग पाहायला मिळाली होती.

व्हिडिओमध्ये अंकिता साडीत दिसत होती. विक्कीदेखील ट्रॅडिशनल आउटफिटमध्ये दिसत होता. अंकिताच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ती हसताना दिसत होत. ते रोमँटिक सॉन्गवर परफॉर्मन्स देताना दिसत होते. हा व्हिडिओ इंटरनेटवर अनेकवेळा पाहण्यात आला. चाहते या क्यूट कपलला शुभेच्छा देत कमेंट्सचा वर्षाव करत होते.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून अंकिता लोखंडे टीव्ही जगतचा लोकप्रिय चेहरा बनली. अंकिताने छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीय. अंकिता लवकरचं आपलं नवीन आयुष्य सुरू करणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Jain (@jainvick)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Jain (@jainvick)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

Back to top button