Story Of HeeraMandi : वारांगनांची झगमगती दुनिया पाकिस्तानातील ‘हिरामंडी’ची ‘ही’ आहे खरी कहाणी | पुढारी

Story Of HeeraMandi : वारांगनांची झगमगती दुनिया पाकिस्तानातील 'हिरामंडी'ची 'ही' आहे खरी कहाणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या लाहौरमधील सर्वात मोठा रेड लाईट एरिया आजदेखील इतिहासाची आठवण करून देतो. झगमगत्या दुनियेतील वारांगना हिरामंडीची शान असायच्या. आजदेखील येथे हिरामंडी आहे, पण ती चमक आज दिसत नाही. अनेक वारांगनांनी हिरामंडी (Story Of HeeraMandi) सोडल्याचे म्हटले जाते. दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये अनेक छोट्या-छोट्या घरांमध्ये या वारांगना दिसून येतात. पाकिस्तानात वेश्यालयावर निर्बंध असल्याचे म्हटले जाते. पण, तरीही वारांगना येथील रस्त्यांवर दिसत असल्याचे बोलले जाते. (Story Of HeeraMandi)

लाहौरमधील हिरामंडी हे ठिकाण राणीप्रमाणे राहणाऱ्या वारांगनाचे असायचे. खास म्हणजे, येथील वारांगना आणि तवायफ यांचे वेगवेगळे व्यवसाय असायचे. हिरामंडीच्या वस्तीमध्ये गाणाऱ्या तवायफची कोठी महफिलनी सजलेली असायची. मुजरा पाहण्यासाठी अनेक बडे लोक दूरवरून इथे यायचे. प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि सन्मानासह त्या जगायच्या. हिरामंडीला शाही मोहल्ला देखील म्हटलं जायचं. अनेक भिंतींनी वेढलेल्या लाहौर शहरात हा बाजार आहे. आजदेखील काही महिला देहव्यापारासाठी येथे येत असल्याचे म्हटले जाते.

हिरा सिंह सम्राट यांच्या नावावरून हिरामंडी हे नाव या ठिकाणाला पडले. त्यांनी शाही मोहल्ल्यात एक खाद्यान्न बाजाराची स्थापना केली. नंतर त्यास ‘हिरा सिंह दी मंडी’ नाव मिळाले. असे म्हटले जाते की, १५ व्या आणि १६ व्या शतकानंतर हा बाजार ऐतिहासिक रूपात तवायफ संस्कृतीचे केंद्र राहिले.

हिरामंडीचा इतिहास तसा खूप जुना आहे. पण, मुघलकाळात लाहौरच्या हिरामंडीमध्ये सुरांची महफिल सजायची. अनेक शौकीनांचे या मंडीकडे पाय वळायचे. आसपासच्या बाजारांमध्येही खूप झगमगती दुनिया असायची. परंतु, देहव्यापार या बाजारांमध्ये व्हायचा नाही. देहव्यापार करणाऱ्या वारांगना वेगळ्या असायच्या आणि नाचणाऱ्या गाणाऱ्या कोठ्यावर असायच्या. बालपणापासून मुली रियाज करत असता आणि मग गाणे गात असत. त्यांना शायरी आणि संगीताचे प्रशिक्षण दिले जायचे.

मुघलांचा काळ संपल्यानंतर गाणाऱ्यांना देखील देहाचा सौदा करावा लागल्याचे म्हटले जाते. काळाच्या ओघात ही झगमगती दुनिया दिसेनाशी झाली. पण अद्यापही हिरामंडी हे ठिकाण ऐतिहासिक रुपात सर्वांच्या समोर येते.

– संकलित माहिती

हेदेखील वाचा – 

 

Back to top button