सुधा भारद्वाज यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर | पुढारी

सुधा भारद्वाज यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई; पुढारी ऑनलाईन

भीमा-कोरेगाव प्रकरणी वकील आणि कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना जामीन मिळाला आहे. भारद्वाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी १ डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे. पण या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इतर ८ आरोपींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यात त्यात सुधीर देवळे, डॉ. पी. वरवरा, रोना विल्सन, सरेंद्र गडलिन्ह, शोमा सेने, महेश राऊत, वर्णन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांचा समावेश आहे.

न्यायमूर्ती एसएस शिंदे आणि न्यायमूर्ती एनजे जमादार यांच्या खंडपीठाने सुधा भारद्वाज यांच्या जामीन याचिकेवरील निकाल याचवर्षी ४ ऑगस्ट रोजी राखून ठेवला होता, तर १ सप्टेंबर रोजी न्यायालयाने उर्वरित ८ आरोपींच्या जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता.

या प्रकरणातील सर्व आरोपींना २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. भारद्वाज आणि इतर आरोपींनी न्यायालयाकडे डिफॉल्ट जामीन देण्याची मागणी केली होती. पुण्यातील सत्र न्यायालयाला यूएपीएच्या खटल्यांची सुनावणी करण्याचा अधिकार नाही, या आधारे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा त्यांचा युक्तिवाद होता.

Back to top button