देशातील सर्वात कमी उंचीची वकील

देशातील सर्वात कमी उंचीची वकील
देशातील सर्वात कमी उंचीची वकील
Published on
Updated on

जालंधर : देशातील सर्वात कमी उंचीच्या बॉडीबिल्डरची अलीकडेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद झालेली आहे. आता देशातील सर्वात कमी उंचीची वकील असलेल्या तरुणीची माहितीही समोर आली आहे. या तरुणीचे नाव आहे हरविंदर कौर. तिची उंची अवघी तीन फूट 11 इंच आहे. पंजाबमधील या तरुणीला एकेकाळी कमी उंचीमुळे होणार्‍या टिंगलटवाळीचा त्रास टाळण्यासाठी शाळेला जाणेही नको वाटत असे. आता हीच तरुणी स्वतः वकील बनली आहे आणि इतरांनाही समस्यांवर मात करून नवे जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

हरविंदर तिसरीत असताना तिला समजले की तिची उंची इतर मुलींसारखी वाढत नाहीये. तिच्यावर उपचारही करण्यात आले; पण या उपचारांचा लाभ झाला नाही. तिला हवाई सुंदरी म्हणजेच एअर होस्टेस बनण्याची इच्छा होती; पण ती पूर्ण होऊ शकली नाही. शाळेत तिला कमी उंचीमुळे टिंगलटवाळीस तोंड द्यावे लागत असे. त्यामुळे शालेय शिक्षण झाल्यावर कॉलेजमध्ये जाण्याचीही तिला भीती वाटू लागली. मात्र, तिला आपल्या कुटुंबावर ओझे बनून जगण्याचीही इच्छा नव्हती. पूर्ण धैर्य एकवटून तिने जालंधरमधील केसीएल इन्स्टिट्यूटमध्ये कायद्याचे शिक्षण घेणे सुरू केले.

तिथेही तिला कमी उंचीवरून टोमणे ऐकावे लागत होते. न्यायाधीशांसमोर उभे राहिल्यावर तू दिसशील तरी का? असेही म्हटले जाई. मात्र, या सर्व मानसिक त्रासावर मात करून तिने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले व आता ती जालंधरमध्येच सेशन्स कोर्टात वकिली करीत आहे. आता तिच्याकडे टिंगलटवाळीच्या द़ृष्टीने नव्हे तर कौतुकानेच पाहिले जाते.

आपली ओळख ही दिसण्यावरून नव्हे तर कामावरून होते हे तिने सिद्ध करून दाखवले आणि आता ती एक मोटिव्हेशनल स्पीकरही बनलेली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 2 लाख 75 हजार फॉलोअर्स आहेत. शारीरिक कमतरतांचा सामना करणार्‍या लोकांना मदत करण्यासाठी ती प्रयत्न करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news