Naga Chaitanya : सामंथाच्या आधी नागा चैतन्य 'या' अभिनेत्रीच्या हाेता प्रेमात

पुढारी ऑनलाईन
टॉलीवूड स्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि समंथा वेगळे झाल्यानंतरदेखील चर्चेत आहे. नागा चैतन्यसाठी घटस्फोटाचे काही दिवस कठीण होते. पत्नी सामंथा रुथ प्रभुसोबत त्याचा घटस्फोट झाला. तुम्हाला माहितीये का, सामंथा हे त्याच पहिलं प्रेम नव्हतं. नागा चैतन्य दुसऱ्या एका अभिनेत्रीच्या प्रेमात होता. (Naga Chaitanya)

श्रुती हासनला डेट करत होता नागा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा हा सामंथा रुथ प्रभुसोबत लग्नाआधी अभिनेत्री श्रुती हासनला डेट करत होता. रिपोर्ट्सनुसार, स्टार नागा आणि श्रुती हासन त्यांचे नाते पुढे नेण्यास तयार होते. दोघेही लग्न करण्यासाठी तयार असल्याच्या चर्चा मीडियामध्ये रंगल्या होत्या.

२०१३ मध्ये सामंथाला भेटला होता नागा
रिपोर्ट्सनुसार, चैतन्य श्रुती हासनशी पहिल्यांदा २०१३ मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटले होते. २०१५ मध्ये त्यांचं नातं तुटलं. रिपोर्ट्सनुसार, दोन्ही स्टार्सचं रोमँटिक नातं फार काळ टिकू शकलं नाही. दोघांनीही आपलं नातं कुठलेही दोष न काढता संपवलं. त्यामुळेचं दोघे आजही मित्र आहेत.

श्रुती हासनशी ब्रेकअपनंतर नागा चैतन्य पुन्हा प्रेमात पडला. ती अदाकारा होती सामंथा. त्यावेळी अभिनेता सिद्धार्थसोबत तिचा ब्रेकअप झाला होता.

- लगीनसराईमुळे छोटे व्यावसायिक आनंदले
- Alia Bhatt wedding : या कारणामुळे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न पुन्हा पुढे ढकलले?
- Omicron : ‘ओमायक्रॉन’चा एकही रुग्ण देशात नाही, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram