Dadasaheb Phalke International Film Festival Awards : अनिल कपूरला ‘ॲनिमल’साठी तर सान्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

anil kapoor-sanya malhotra
anil kapoor-sanya malhotra

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेगास्टार अनिल कपूरला नुकत्याच झालेल्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ॲवॉर्ड २०२४ ॲनिमलसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. (Dadasaheb Phalke International Film Festival Awards) एक वडील म्हणून अनिल कपूर यांची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आणि या चित्रपटाने त्यांनी खूप यश कमावलं. बलबीर सिंगच्या भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. (Dadasaheb Phalke International Film Festival Awards)

संबंधित बातम्या –

या अभिनेत्याने दोन महिन्यांच्या कालावधीत सलग दोन सुपरहिट चित्रपट केले. ॲनिमल आणि फायटरमधून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. Animal ने ८७० करोड कमावले तर Fighter यशस्वीपणे सुरु आहे आणि बॉक्स ऑफिसवर ३५० कोटी पार केले आहे.

सान्या मल्होत्राने पटकवला "कठहल"साठी पुरस्कार

सान्या मल्होत्रा ​​हिला 'कठहल मधील कॉमिक रोल साठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार मिळाला. सान्या मल्होत्राने नुकत्याच झालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात एक खास पुरस्कार पटकावला आहे. इन्स्पेक्टर महिमा बसोदच अनोखं पात्र साकारून तिने ही भूमिका पार पाडली आहे.

सान्या सध्या "मिसेस"च्या रिलीजच्या तयारीत आहे. जो "द ग्रेट इंडियन किचन" या गाजलेल्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे आणि आरती कडव दिग्दर्शित आहे. ती वरुण धवनसोबत 'बेबी जॉन'मध्ये दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news