सारं काही तिच्यासाठी : रघुनाथ खोत नीरजला माफ करतील का? | पुढारी

सारं काही तिच्यासाठी : रघुनाथ खोत नीरजला माफ करतील का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये निशी- नीरजच्या प्रेमाची परीक्षा सुरूच आहे. आतापर्यंत मुलींना नात्यात अग्नीपरीक्षा देताना पहिले असेल पण ‘सारं काही तिच्यासाठी’ मध्ये नेहमीच काही तरी वेगळं बघायला मिळत आहे. नीरजने काय नाही केलं निशीच्या वडिलांचा म्हणजे रघुनाथ खोतांचा विश्वास मिळवण्यासाठी. त्याच्या आणि निशीच्या नात्याला मंजुरी मिळवण्यासाठी. खोतांच्या घराबाहेर आपलं घर मांडलं आणि आता तर चक्क आगीत जाऊन निशीला वाचवणार आहे.

संबंधित बातम्या –

उमाची साथ नीरजला पहिल्या पासूनच आहे पण रघुनाथच खोतांचं मन जिंकणं इतकं सोपं नाही. नीरज आपल्या अपहरणाची बातमी ही लपवतो कारण हे सर्वांनाच माहिती आहे की, जर ही बातमी बाहेर पडली तर पहिला संशय रघुनाथ खोतांवरच येईल आणि नीरजला गोष्टी अजून चिघळलेल्या नको आहेत. पण उमाच्या मनात शंका आहे की, नीरज काहीतरी लपवतोय आणि ती रघुनाथ खोतांसमोर हे व्यक्त करते. उमा अजून ही नीरजची बाजू घेतेय म्हणून तो संतापतो. पण शेवटी रघुनाथ खोतांसमोर नीरजच सत्य समोर येताच. नीरजचं कोणतं सत्य कळलंय रघुनाथला खोतांना? ते नीरजला माफ करतील की अजून एक नवीन युद्ध सुरु होईल? तेव्हा नीरज-निशीच्या नात्यासाठी बघायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ संध्या ७:०० वा. झी मराठीवर.

Back to top button