Bhool Bhulaiyaa 3 : मंजुलिका येतेय! विद्या बालनसोबत 'या' अभिनेत्रीची एन्ट्री? | पुढारी

Bhool Bhulaiyaa 3 : मंजुलिका येतेय! विद्या बालनसोबत 'या' अभिनेत्रीची एन्ट्री?

पुढारी ऑनालईन डेस्क : Bhool Bhaulaiyaa 3 मध्ये कार्तिक आर्यनने विद्या बालनची वापसी कन्फर्म केली आहे. यासोबत आणखी एका अभिनेत्रीची यामध्ये एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आलीय. फेमस हॉरर-कॉमेडी फ्रेंचायजी चित्रपट ‘भूल भुलैया’च्या तिसऱ्या भागाची घोषणा झाली आहे. यावेळी कार्तिक आर्यन दोन भूतांशी लढताना दिसणार आहे. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) ने फिल्म चित्रपटाच्या घोषणेसोबत ‘मंजुलिका’ विद्या बालन (Vidya Balan) चित्रपटात असल्याचे निश्चित केले होते. आता आणखी एक अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. (Bhool Bhulaiyaa 3)

संबंधित बातम्या –

‘भूल भुलैया ३’ मध्ये आणखी एक मुख्य अभिनेत्री दिसणार

दिग्दर्शक अनीज बज्मीच्या ‘भूल भुलैया ३’ मध्ये पुन्हा एकदा ‘रूह बाबा’ कार्तिक आर्यन हवेलीतील भूत घालवताना दिसणार आहे. जेव्हापासून चित्रपट थर्ड इन्स्टालमेंटची माहिती समोर आली आहे, तेव्हापासून सोशल मीडियावर ही बाब ट्रेंड करत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) असणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

धक-धक गर्ल असेल हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा हिस्सा

‘मंजुलिका’ विद्या बालनची वापसी कन्फर्म झाल्यानंतर आता माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) देखील चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, यावेळी एक नाही तर दोन भूतांशी ‘रुह बाबा’चा सामना होईल.

बंगाली प्लॉटवर असेल चित्रपटाची कथा

‘भूल भुलैया ३’ चित्रपटाचा बॅकड्रॉप वेस्ट बंगालवर आधारित असेल. याचा अर्थ आहे की, चित्रपटामध्ये पुन्हा एकदा एका बंगाली परिवाराची कथा दाखवण्यात येईल. चित्रपटाचे अनेक सीन कोलकातामध्ये शूट होईल. ‘भूल भुलैया ३’ या दिवाळीच्या औचित्याने रिलीज होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

View this post on Instagram

 

A post shared by kartik aryan (@kartikaryan_2)

Back to top button