‘श्वास’मधील ‘आजोबा’ भिकाजी जोशी काळाच्या पडद्याआड | पुढारी

'श्वास'मधील 'आजोबा' भिकाजी जोशी काळाच्या पडद्याआड

वेंगुर्ले : पुढारी वृत्तसेवा – वेंगुर्ले तालक्यातील परूळे भटवाडी येथील रहिवासी भिकाजी बाळकृष्ण उर्फ दाजी जोशी (वय ८८) यांचे सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी रात्री निधन झाले. जुन्या पिढीतील दाजी भटजी पुरोहित म्हणून ते प्रसिद्ध होते. सन २००४ साली प्रदर्शित झालेल्या आणि ऑस्कर पुरस्कार प्राप्त श्वास चित्रपटातील आजोबांची भूमिका अरुण नलावडे यांनी दाजी जोशी यांच्या रूपरेखेवर आधारित साकारली होती. जोशी यांच्याप्रमाणे रूपरेखा साकारण्यात आली होती.

श्वास चित्रपट नातू व आजोबा यांच्या संबंधावर पूर्णतः अवलंबून होते आणि आजोबांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण नलावडे यांनी जोशी यांच्या घरी काही दिवस मुक्काम करून त्यांचे हावभाव व वागणूक याचा अभ्यास केला होता. श्वास चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर पिक्चरच्या सर्व टीमने जोशी यांच्या घरी येऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. शेखर जोशी यांचे ते वडील होत.

Back to top button