Mithun Chakraborty ना रुग्णालयातून डिस्चार्ज, पीएम नरेंद्र मोदींनी फटकारल्यानंतर... | पुढारी

Mithun Chakraborty ना रुग्णालयातून डिस्चार्ज, पीएम नरेंद्र मोदींनी फटकारल्यानंतर...

पुढारी ऑनालईन डेस्क : मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आता ते घरी परतले आहेत. (Mithun Chakraborty) त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मिथुन यांनी स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, आता ते ठिक आहेत. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून फटकार खावी लागली. (Mithun Chakraborty)

संबंधित बातम्या –

अभिनेते मिथुन चक्रवर्ती मागील दोन-तीन दिवसांपासून कोलकाता येथील एका खासगी रुग्णालायत दाखल होते. मिथुन यांना अचानक छाती दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान, निदान झाले की, त्यांना स्ट्रोक आला होता. आता ते रुग्णालयातून बाहेर आल्य़ानंतर त्यांनी सांगितलं की, वास्तवात काही समस्या नाही, मी खूप ठिक आहे. मला फक्त माझ्या आहारावर नियंत्रण ठेवायला हवं. मी लवकरच काम करणे सुरू करू शकतो, कदाचित उद्यापासूनचं.

मिथुन म्हणाले, पीएम मोदी यांनी मला रविवारी फोनवरून माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. मी तब्येतीकडे लक्ष न दिल्याने त्यांनी मला फटकारले.

Back to top button