Manushi Chhillar चं ‘बडे मियाँ छोटे मियाँ-ऑपरेशन व्हॅलेंटाईन’चं खास सेलिब्रेशन | पुढारी

Manushi Chhillar चं 'बडे मियाँ छोटे मियाँ-ऑपरेशन व्हॅलेंटाईन'चं खास सेलिब्रेशन

पुढारी ऑनलाईन डेस्क : मानुषी छिल्लर दोन चित्रपटांच्या रिलीजसाठी तयारी करत आहे. मानुषी छिल्लर स्टारर बडे मियाँ छोटे मियाँ आणि ऑपरेशन व्हॅलेंटाईन हे बडे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Manushi Chhillar) मानुषीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक खास व्हिडिओ शेअर केला असून दोन चित्रपट रॅपचे तिने खास सेलिब्रेशन केलं आहे आणि ते या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं आहे. तिने या व्हिडिओला कॅप्शनमध्ये म्हटलंय- “आणि अशा प्रकारे आम्ही एका वीकेंडमध्ये 2 चित्रपट रॅप अप केलं 😎 🤪🍕🥂🍾❤️” (Manushi Chhillar)

संबंधित बातम्या –

मानुषी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत बडे मियाँ छोटे मियाँमध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार असून या वर्षीच्या ईद ला हा चित्रपट रिलीज होणार आहे तर दुसरीकडे १ मार्च, २०२४ ला ऑपरेशन व्हॅलेंटाइनमध्ये मानुषी वरुण तेज सोबत झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)

Back to top button