मराठमोळी पार्श्वभूमी लाभलेली ‘उडने की आशा’ लवकरच | पुढारी

मराठमोळी पार्श्वभूमी लाभलेली ‘उडने की आशा’ लवकरच

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘स्टार प्लस’ वाहिनीने आपल्या नव्या ‘उडने की आशा’ या नाट्यमय मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेत कन्वर ढिल्लन आणि नेहा हसोरा यांच्या प्रमुख भूमिका असून या मालिकेत नात्यातील गुंतागुंत दाखवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

उत्तम दर्जाच्या मालिका सादर करण्याची परंपरा जपत ‘स्टार प्लस’ वाहिनीने ‘उडने की आशा’ ही नवी मालिका सादर केली आहे. या मालिकेत कन्वर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हसोरा (सायली) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून सचिन आणि सायली यांच्या प्रेमाची गाथा आणि नातेसंबंधांची गुंतागुंत या मालिकेतून सादर केली जाणार आहे. या मालिकेला मराठमोळी पार्श्वभूमी लाभली आहे.

‘स्टार प्लस’ वाहिनीवर सादर होणाऱ्या ‘उडने की आशा’ या मालिकेतून एका पत्नीच्या भावभावनांच्या कल्लोळाचे चित्रण करण्यात आले आहे. ती तिच्या नाखुष पतीला जबाबदार व्यक्तीत कसे परावर्तित करते आणि याचा काही प्रमाणात संपूर्ण कुटुंबावर कसा परिणाम होतो, हे नाट्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.

कन्वर ढिल्लन यांनी सचिनची भूमिका साकारली आहे, जो एक टॅक्सी ड्रायव्हर आहे, तर नेहा हसोराने ‘उडने की आशा’ या मालिकेत सायली या फुलविक्रेतीची भूमिका साकारली आहे. सचिन आणि सायली यांच्या भावनिक नात्याच्या प्रवासाची ही कहाणी आहे. या मालिकेची निर्मिती राहुल कुमार तिवारी यांनी केली आहे.

‘उडने की आशा’ या मालिकेतील नेहा हसोरा सांगितले की, “उडने की आशा’ या मालिका मराठमोळी असून सायली एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी आहे. सायली एक फुलविक्रेती असून ती फुले विकून तिच्या कुटुंबाची गुजराण करते. ‘उडने की आशा’ या मालिकेतील माझ्या भूमिकेबाबत मी खूप उत्साही आहे आणि ही भूमिकेची संधी दिल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान मानते.”

Back to top button