भारतातील अद्भूत गोष्टी OMG! Yeh Mera India शोमधून कृष्णा अभिषेक भेटीला | पुढारी

भारतातील अद्भूत गोष्टी OMG! Yeh Mera India शोमधून कृष्णा अभिषेक भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्हाला भारताच्या हॉकी व्हिलेजबाबत माहीत आहे का, जिथून ६० पेक्षा जास्त ख्यातनाम राष्ट्रीय खेळाडू आले आहेत. किंवा मेड इन इंडिया वॉशिंग मशीन जी अर्ध्या ग्लास पाण्याने फक्त ८० सेकंदांत भरपूर कपडे धुवू शकते? किंवा कर्नाटकची सावित्रीअम्मा जी निराधार बिबट्याच्या पिल्लांचा सांभाळ करते? या फक्त काहीच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. हिस्टरी टीव्ही१८ आपल्या सर्वाधिक काळ चाललेल्या स्थानिक निर्मिती ओएमजी! ये मेरा इंडियाचा दहावा अवतार आणण्यासाठी सज्ज आहे. येत्या सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता प्रीमियर असलेल्या या अप्रतिम शोच्या सीझनमध्ये अभूतपूर्व आणि अद्वितीय गोष्टी पाहायला मिळतील.

संबंधित बातम्या-

विनोदवीर आणि निवेदक कृष्णा अभिषेक हा पहिल्या दिवसापासून या ट्रेंडिंग मालिकेचा चेहरा ठरला आहे. आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला की, “ओएमजी! ये मेरा इंडिया’ ही मालिका माझ्या करियरमधील सर्वाधिक यशस्वी शोजपैकी एक आहे. या महान देशाच्या अज्ञात गोष्टी जगापुढे आणणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा नवीन सीझन खूप सुंदर गोष्टी आपल्यासमोर आणेल आणि ती प्रेक्षकांसाठी नक्कीच एक दृश्य मेजवानी असेल. हा सीझन खूप खास आहे आणि तो शोच्या प्रवासात एक ऐतिहासिक टप्पा ठरेल.”

या शोचा प्रीमियर १२ फेब्रुवारी रोजी सोमवारी रात्री ८ वाजता होईल.

Back to top button