Sunny Deol : 'गदर ३'-'बॉर्डर २' च्या अफवांनी कंटाळला सनी, सीक्वेलबद्दल दिली मोठी अपडेट | पुढारी

Sunny Deol : 'गदर ३'-'बॉर्डर २' च्या अफवांनी कंटाळला सनी, सीक्वेलबद्दल दिली मोठी अपडेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सनी देओल ( Sunny Deol ) आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या ‘गदर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिकची कमाई करत धुमाकूळ घातला आहे. सनीच्या चित्रपटातील ‘तारा सिंह’ नावाच्या भूमिकेने आजही चाहत्यांनी मनात घर केलं आहे. याशिवाय सनीचा २००१ मधील ‘गदर’ हा चित्रपटातने त्याला खूपच लोकप्रियता मिळाली. दरम्यान ‘गदर २’ हिट झाल्यानंतर चाहत्यांनी ‘गदर ३’ आणि ‘बॉर्डर २’ चा सीक्वल लवकरच घेवून येणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. या अफवांचे खंडन करत सनीने नव्याने एक खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या 

‘बॉर्डर २’ आणि ‘गदर ३’ वर सनीचा खुलासा

अभिनेता सनी देओलने ( Sunny Deol ) नुकतेच दिलेल्या मुलाखतीत ‘बॉर्डर २’ आणि ‘गदर ३’ च्या चित्रपटाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. या मुलाखतीत सनीला ‘बॉर्डर २’ आणि ‘गदर ३’ चित्रपटावर काम करत आहात काय? असे विचारण्यात आलं. यावेळी सनीने उत्तर देताना म्हटलं की, ”सध्या ‘गदर २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं आहे. दरम्यान ‘बॉर्डर २’ आणि ‘गदर ३’ ची चर्चा रंगू लागली आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांनी मी कंटालोय. मला अजून तरी याबद्दल काहीही माहिती नाही. जर हे चित्रपट मला मिळाले तर नक्कीच मी ही माहिती तुम्हाला सांगेन. थोडा धीर धरा.”

याशिवाय सनी पुढे बॉलिवूड अभिनेता आमिर खान निर्मिती आगामी १९४७ चित्रपटाचे जोरदार शुटिंग करत असल्याचे सांगितले आहे. या मिळालेल्या माहितीवरून सनी देओल आगामी ‘बॉर्डर २’ आणि ‘गदर ३’ चित्रपटात काम करत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

सनी देओलच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक दमदार चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. परंतु, त्याचे देशभक्तीवरील चित्रपट चाहत्यांना खूपच आवडले आहेत. तर सनीच्या गदर चित्रपटाचा सिक्वेल बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटात तारा सिंग आणि सकिना यांच्या मुलाची प्रेमकथा दाखविण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

Back to top button